6 special tips to look younger.. How to look younger and stay fit?
फिट राहण्याचे 6 सोपे उपाय, रुटीनमध्ये करा फक्त काही छोटे बदल, रहाल नेहमीच तरुण... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 08:07 AM2022-09-07T08:07:00+5:302022-09-07T08:10:01+5:30Join usJoin usNext १. आपण कायम तरुण रहावं, असं कुणाला वाटणार नाही... म्हणूनच त्यासाठी या बघा काही खास टिप्स. या काही गोष्टी करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. तुमच्या रुटीनमध्ये फक्त काही थोडेसे बदल करा आणि बघा त्याचा कसा छान परिणाम दिसून येतो.. २. तुमच्या आहारातला प्रोटीन्सचा सहभाग वाढवा. प्रोटीन्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. तसेच स्नायुंमधील ताकद वाढवते. ३. आहारातील पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा. त्यामुळे जळजळ, ॲसिडीटी असा त्रास होणार नाही. ४. आहारातलं साखरेचं प्रमाण शक्य तेवढं कमी करा. आहारातली साखर वाढली की एजिंग प्रोसेस आणखी जलद होऊ लागते. ५. दररोज मोकळ्या हवेत जाऊन काही काळ वॉकिंग करा. त्याचा आरोग्यावर आणि त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. तसेच त्यामुळे कॉर्टिसोलचे प्रमाणही कमी हाेते. ६. झोपेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. रात्री वारंवार जागरण होत असेल तर त्याचा वाईट परिणाम नक्कीच आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. ७. दररोज एक तरी फळ खा. त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ॲण्टऑक्सिडंट्स मिळतात. टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सFitness TipsHealthHealth Tips