आधीच घाई त्यात पर्स किंवा पँटची चेनच खराब झाली? ६ टिप्स, चेन करा दुरुस्त दोन मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 02:23 PM2023-02-27T14:23:47+5:302023-02-27T14:28:54+5:30

6 ways to fix a broken zipper - best tips and tricks धुतल्यानंतर कपड्यावरील अथवा बॅगची चेन खराब होते, यासाठी ६ सोपे ट्रिक्स

बऱ्याचदा बाहेर जात असताना, काहीतरी काम बिघडले की पूर्ण दिवस खराब जातो. असाच काहीसा प्रकार तेव्हा होतो जेव्हा, बॅग किंवा पँटची चेन खराब होते. अशा परिस्थितीत काय करावे हे सुचत नाही. चेन खराब झाली की आपली चांगलीच तारांबळ उडते. घरात चेन खराब झाली तर, त्याला दुसरा पर्याय शोधण्यात वेळ जातो.

जर चेन एखाद्या कार्यक्रमात किंवा बाहेर असताना खराब झाली की, ऐनवेळी दुसरा पर्याय देखील लवकर मिळत नाही. आपल्यासोबत देखील असाच काहीसा प्रकार घडला असेल, तर काही ट्रिक्सच्या मदतीने घरबसल्या चेन दुरुस्त करता येईल.

काही वेळेला कपडे किंवा बॅग धुतल्यानंतर चेन खराब होते. अशा परिस्थितीत मेणाचा वापर करून चेन दुरुस्त करता येईल. यासाठी मेण चेनवर घासा. त्यानंतर चेन वर - खाली करा. यामुळे चेन पूर्वीसारखी नीट होईल.

पेट्रोलियम जेल फक्त चेहऱ्याचे संरक्षण करत नाही, तर अनेक कारणांसाठी वापरली जाते. खराब झालेल्या चेनवर देखील पेट्रोलियम जेलचा वापर करता येईल. यासाठी झिपवर पेट्रोलियम जेली लावा, झिप दोन ते तीन वेळा वर आणि खाली हलवा. असे केल्याने चेन नीट होईल.

पेन्सिल फक्त लिहण्यासाठी नाही, तर चेन नीट करण्यासाठी देखील होईल. चेन खराब झाल्यानंतर त्यावर पेन्सिलची टीप घासा. यामुळे चेन लवकर नीट होईल.

झिप खराब झाली असेल तर, त्यावर ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका. आता चेन वर - खाली करा. असे केल्याने चेन नीट होईल.

क्रेयॉन फक्त रंग भरण्यासाठी नाही तर इतर कामासाठी देखील वापरता येते. यासाठी घरामध्ये असलेले क्रेयॉन झिपवर घासा, दोन ते तीन वेळा वर-खाली हलवा. यामुळे चेन लवकर नीट होईल.

अंघोळीचा साबण फक्त त्वचेवरील किटाणू काढण्यास मदत करत नाही, तर याने आपण झिप देखील नीट करू शकता. यासाठी साबण खराब झालेल्या झिपवर घासा. त्यानंतर झिप वर - खाली करा. याने चेन पूर्वीसारखी नीट होईल.