दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 04:15 PM 2024-10-23T16:15:42+5:30 2024-10-23T16:51:29+5:30
7-day diet plan to lose weight and detox before Diwali : नवीन कपड्यांमध्ये सुंदर - फिट दिसायचं असेल तर; ७ गोष्टी करून पाहा दिवाळी (Diwali 2024) या सणाची वाट प्रत्येक जण करत असतो (Diwali 2024). फराळ, फटाके आणि नवीन कपडे. यामुळे आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मक वाटतं (Weight loss). मिठाई आणि पदार्थांशिवाय हा सण अपूर्ण आहे(7-day diet plan to lose weight and detox before Diwali).
दिवाळी जवळ येताच आपण शॉपिंग करतो. त्या नवीन कपड्यांमध्ये आपल्याला सडपातळही दिसायचं असतं. त्यामुळे आपण दिवाळी हा सण येण्यापूर्वी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो.
विविध प्रकारचे व्यायाम आणि डाएट फॉलो करतो. वेट लॉससाठी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर आपल्याला वेट लॉस करायचं आहे, आणि दिवाळीपर्यंत सुडौल आणि फिट दिसायचं असेल तर, आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करुन पाहा. या टिप्समुळे नक्कीच वेट लॉससाठी मदत होईल.
वेट लॉससाठी स्क्रीन टायमिंग कमी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल स्क्रीन टायमिंग आणि वजन कमी करण्याचं संबंध काय? बऱ्याचदा जेवताना आपण मोबाईल फोनचा वापर जास्त करतो. ज्यामुळे खाताना आपलं पूर्ण लक्ष मोबाईल फोनवर असतं. ज्यामुळे आपण किती आणि काय खात आहोत, हे कळून येत नाही. ज्यामुळे वेट गेन होते.
पोटाला आराम मिळावा म्हणून, हलका आहार घ्या. पालेभाज्या, कडधान्य, सुका मेवा आणि बियांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमुळे डिटॉक्स प्रक्रियेस गती मिळते. ज्यामुळे वेट लॉसमध्ये मदत होते. आपण नाश्त्याला पालक, सीड्स दुपारच्या जेवणात विविध डाळींचे सॅलॅड,आणि रात्री बदाम स्मुदी पिऊ शकता.
रिव्हर्स फास्टिंगमध्ये डिनर ६-७ वाजेच्या दरम्यान करावे. नंतर दुसऱ्या दिवशी ९-१० लंच करावे. रात्रीचे लवकर जेवल्याने शरीराला पचनासाठी अधिक वेळ मिळतो, ज्यामुळे चयापचय सुधारते आणि जलद वजन कमी होण्यास मदत होते.
दिवसाची सुरुवात डिटॉक्स पेयाने करा. यासाठी कोमट पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर आणि दालचिनी पावडर घालून मिक्स करा. आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. या पेयामुळे ब्लड शुगर नियंत्रित, वाढलेलं वजन कमी आणि चयापचय बुस्ट करण्यास मदत होईल. हे पेय प्यायल्यानंतर २० -३० मिनिटे काहीच खाऊ नये.
दुपारच्या जेवणात आपण फळे, सॅलड, स्मूदी असे कच्चे पदार्थ खाऊ शकता. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल. मात्र, डिनरमध्ये शिजवलेले पदार्थ खा. त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त ठेवा.
शरीर डिटॉक्सिफिकेशन आणि वजन कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्स असलेल्या गोष्टी खा. आहारात दह्याचा समावेश करा. यातील गुणधर्मांमुळे वेट लॉससाठी मदत होते.
साखरेचा चहा पिण्याऐवजी आपण हर्बल टी पिऊ शकता. डिनरनंतर हर्बल चहा प्या. यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचेल. याशिवाय जंक फूड टाळा, दिवसभर पाणी प्या आणि व्यायाम करा.