उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 05:30 PM 2024-10-29T17:30:47+5:30 2024-10-29T17:40:08+5:30
7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse : कोण म्हणतं जाड दंड - रुंद खांद्यावर डिझाईनर ब्लाउज शोभून दिसत नाही? दिवाळी म्हटलं की शॉपिंग आलीच (Shoping). खरेदीला गेल्यावर आपण हमखास पारंपारिक किंवा डिझाईनर साडी (Designer Saree) खरेदी करतो. साडी खरेदी केल्यानंतर ब्लाऊज नेमका कोणत्या पॅटर्नचा शिवायचा कळत नाही(7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse).
ब्लाऊजचे अनेक फॅशनेबल डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण जाड दंड आणि रुंद खांदे असल्यावर कोणते ब्लाऊज डिझाईन शोभून दिसतील? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतो.
जर आपले शरीर सडपातळ आणि दंड जाड, शिवाय शोल्डर रुंद असल्यास अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे हे ७ ब्लाऊज डिझाईन ट्राय करून पाहा. संपूर्ण लूक बदलेल, आणि रुंद शोल्डरमुळे शरीर जाडही दिसणार नाही.
उर्वशीचे ब्लाऊज कलेक्शन जबरदस्त आहे. तिच्याकडे अनेक प्रकारचे ब्लाऊज आहेत. जर आपली साडी ग्लिटरी असेल तर, आपण स्ट्रॅप ब्लॉऊजही शिवू शकता.
रुंद खांद्यांवर स्केवेअर ब्लाऊज डिझाईन सुंदर दिसतील. स्केवेअर नेक ब्लाऊज कोणत्याही साडी पॅटर्नवर शोभून दिसतील.
आपण स्लिव्हजलेस ब्लाऊजही शिवू शकता. साडी जर सोनेरी रंगाची असेल तर, त्यावर स्लिव्हजलेस ब्लाऊज शोभून दिसेल.
जर आपल्याला आकर्षक लूक हवा असेल तर, आपण ब्रॉड नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. यामुळे अतिशय रिच लूक मिळेल.
स्टायलिश लूक हवा असेल तर, आपण शिमरी ऑफ शोल्डर ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकता. यामुळे दिवाळीत चमकदार लूक मिळेल.
जर साडी ग्लिटरी असेल तर, आपण प्लेन व्हि नेक स्लिव्हजलेस ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकता. हा ब्लाऊज पॅटर्न रुंद खांदे असलेल्या महिलांवर शोभून दिसेल.
जर आपण लग्न किंवा कोणत्यातरी कार्यक्रमात जात असाल तर, गोटा - पट्टी वर्क डिझाईनचा ब्लाऊज पॅटर्न ट्राय करा. यामुळे लूकला चारचांद येईल.