नो मेकअप लुकसाठी ७ सोप्या स्टेप्स, चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 06:45 PM2022-11-16T18:45:02+5:302022-11-16T19:00:58+5:30

No Makeup Look नो मेकअप लुकला नॅचरल मेकअप लुक असंही म्हणतात. नो मेकअप लुक मिळवणं अगदी सोपं आहे. काही सोप्या टिप्स आणि स्टेप्स फॉलो करून हा नॅचरल मेकअप करू शकता.

सध्या नो मेकअप लुकचा ट्रेंड प्रचंड फॉर्ममध्ये आहे. क्युट गर्ल आलिया भट्टने तिच्या लग्नात हा नो मेकअप लूक कॅरी केला होता. ज्याची चर्चा सोशल मिडीयावर प्रचंड झाली होती. या नो मेकअप लुकला नॅचरल मेकअप लूक देखील म्हणतात. या लुकमध्ये आपण सिंपल आणि ग्लॅमरस दिसता. काॅलेज अथवा ऑफिसमध्ये आपण भारी मेकअप लावून जाऊ नाही शकत. त्यासाठी आपण नो मेकअप लूक कॅरी करू शकता. हा लूक कमी वेळात आणि कमी मेकअप प्रोडक्ट्समध्ये तयार होतो. या लुकमुळे आपला चेहरा ग्लोविंग आणि तजेलदार दिसतो. नो मेकअप लुकसाठी या सोप्या स्टेप्स आणि टिप्स फॉलो करा.

हा लूक मिळवण्यासाठी काजल, मस्करा, न्यूड लिपस्टिक, कन्सीलर, पावडर, प्राइमर, बीबी, सीसी क्रीम आणि मॉइश्चरायझरची आवश्यकता आहे.

फेशियल क्लिन्झिंग हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. चेहऱ्यावर साचलेले प्रदूषण आणि धूळ साफ करण्यासाठी, क्लिंझर महत्वाचे आहे. चेहरा क्लिंझरद्वारे साफ केल्याने छिद्रांमध्ये साचलेली घाणही साफ करता येते.

त्वचेवर मेकअप करण्यापूर्वी योग्य प्रकारे मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. बऱ्याच महिलांची त्वचा ही खुप कोरडी असते. जर त्वचा हायड्रेटेड नसेल, तर मेकअप केल्यानंतर, एक पॅची लुक तयार होतो, जो काही वेळानंतर कुरूप दिसू लागतो. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी हलके मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.

त्वचेला योग्य आधार देण्यात प्राइमर महत्त्वाची भूमिका बजावतो. स्टेप ईवन टोन देण्यासाठी प्राइमर खुप महत्वाचे आहे. त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्राइमर लावावे. जेणेकरून मेकअप करण्यासाठी त्वचेला चांगला बेस मिळेल.

चेहऱ्याला चांगले मॉइश्चरायझ केल्यानंतर बीबी, सीसी किंवा लाईट फाऊंडेशन वापरणे उत्तम. फाऊंडेशन लावल्याने त्वचा सम-टोन आणि सुंदर दिसते. फाऊंडेशन आपल्याच स्कीन - टोनचा वापरावे. फाऊंडेशन लावल्यानंतर चेहऱ्याला एक नॅचरल लूक मिळतो.

काही महिलांना असे वाटते की मेकअप किटमध्ये कंसीलर असणे आवश्यक नाही, परंतु असा विचार करणे चुकीचे आहे, कारण अनेक मेकअप तज्ञांच्या मते काळे डाग, किंवा काळी वर्तुळे लपविण्यासाठी कंसीलर खुप मदत करते. कंसीलर लावल्याने चेहरा बेडाग आणि सुंदर दिसतो.

काजल आणि मस्कारा डोळ्यांवर लावल्याने डोळे खुप सुरेख आणि सुंदर दिसतात. म्हणूनच मेकअप किटमध्ये काजल नेहमी सोबत ठेवावे. मस्करा लावल्याने डोळ्यांच्या पापण्या अधिक मोठे आणि ठळक दिसतात. ज्या मुलींच्या पापण्या हलक्या आणि छोट्या आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

नो मेकअप लुकमध्ये जर गडद रंगाची लिपस्टिक लावली, तर तो मेकअप लूक दिसून येतो. त्यासाठी न्यूड लिपस्टिक अथवा लाईट शेडमध्ये लिपस्टिक लावावी. या लुकमध्ये लाईट पिंक शेड लिपस्टिक अधिक खुलून दिसेल.