थुलथुलीत जाडजूड दंड सुडौल करणारे ७ सोपे उपाय! दंड विचित्र दिसतात म्हणून नाराज नका होऊ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 15:40 IST2025-04-09T15:27:11+5:302025-04-09T15:40:14+5:30

7 easy ways to make your thick, chubby arms look slimmer : या काही व्यायामांमुळे वाढलेले दंड होतील छान बारीक. पाहा काय कराल.

आपल्याला विविध प्रकारचे फॅन्सी कपडे घालायला आवडतात. साडी नेसायलाही आवडते. मात्र बरेचदा आपण आपल्या हातावरील फॅट्समुळे अनकम्फर्टेबल असतो. दंडाचा आकार फार मोठा असला की स्लिव्हलेस कपडे आवडत असूनही आपण घालत नाही.

बऱ्याच जणींचे शरीर छान सुडौल असते, मात्र दंड फार मोठा आणि थुलथुलीत असतो. दिसताना फारच जाड दिसतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. दंड अगदी मऊ आणि मांसाळ दिसतो.

तुम्हालाही दंडाचा आकार कमी करायचा असेल तर काही व्यायाम आहेत, ते केल्याने महिन्याभरातच फरक जाणवे. सातत्याने हे व्यायाम केल्याने दंडांचा आकार कमी होऊन दंड बेढब दिसणार नाहीत.

दंडाचा आकार कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे फ्लॅन्क. कोपरापासून तळव्यापर्यंतचा भाग जमिनीवर ठेवायचा हातावर जोर देऊन शरीर वर उचलायचे. काही सेकंद त्याच पोजमध्ये राहायचा प्रयत्न करा.

वॉल पुशअप्स करा. भिंतीवर दोन्ही तळवे टेकवायचे. पाय भिंतीपासून लांब ठेवायचे आणि भिंतीला धक्का मारल्यासारखे पुशअप्स मारायचे.

रोज थोड्या चेअर डिप्स मारा. खुर्चीसमोर उलटे उभे राहा. हात उलटे मागे खुर्चीवर ठेवा. एक पाय हवेत घ्या. आणि मग शरीर वर-खाली करत डिप्स मारा. खुर्ची चांगली वजनदार वापरा.

जीममध्ये जसे वजन उचलले जाते तसे वजन उचला. दंडांसाठी फार फायद्याचे ठरते. घरी असलेल्या कुटणीचा किंवा खलबत्याचा वापरही करू शकता. एखादा जड दगड वापरू शकता.

पुलअप्स मारायचा प्रयत्न करा. पुलअप्स मारणे फार सोपे आहे असे नाही. सगळ्यांनाच व्यवस्थित जमत नाहीत. मात्र प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच जमेल. हातातील ताकदही वाढेल.

दोन्ही हात हवेमध्ये ठेऊन हात गोलाकार फिरवायचे. याला आर्म सर्कल्स असे म्हणतात. हातावर जोर पडायला हवा. दंडावर जोर आल्याने दंडाचा आकार कमी होतो.

इतरही अनेक व्यायाम आहेत, जे केल्याने दंडांचा आकार कमी होतो. योग्य आहार घेणेही गरजेचे असते.