रात्री मुळीच खाऊ नयेत असे ७ पदार्थ, पचनावर ताण-झोपेचेही त्रास आणि वजनही वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 05:23 PM2022-12-03T17:23:16+5:302022-12-03T17:30:38+5:30

Food to avoid at Night रात्री पचायला हलकं खाणं उत्तम, त्यामुळे काही गोेष्टी न खाणं आरोग्याला लाभदायक ठरतं.

नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असे आपण किमान तीनदा खातोच. मात्र काही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा सर्व ताण आपल्या पचनक्रियेवर पडतो. काही लोकं वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी सात नंतर जेवण करणं टाळतात. त्याचबरोबर रात्री पचायला जड असे काही पदार्थ खाणं टाळणंच उत्तम.

रात्रीच्या वेळेस पनीर खाल्ल्याने ते पचनास जड जातात. याने तुमच्या झोपेवर देखील परिणाम होऊ शकतो.

हॉट सॉसचा जास्त वापर रात्रीच्या वेळेस करू नये. यामुळे अनेकदा शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. जळजळ होण्याची देखील समस्या निर्माण होते.

ब्रेड आणि पास्तामध्ये भरपूर प्रमाणावर स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असतात, जे आपल्या शरीरात ग्लुकोजच्या स्वरूपात रूपांतरित होतात. त्यामुळे रात्रीच्यासमयी ब्रेड, पास्ता जे मैदापासून बनवलेले पदार्थ आहेत, ते शक्यतो टाळावे.

चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणावर कॅफिन आढळून येते. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. ते पचायला देखील जड जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळीस चॉकलेट खाऊ नये. आपण त्याव्यतिरिक्त डार्क चॉकलेट खाऊ शकता.

फ्रंटियर्स ऑफ सायकॉलॉजीमधील अभ्यासानुसार, चिप्स खूप तेलकट असते. जे रात्री खाल्ल्याने पचायला वेळ घेते. चिप्स खाल्ल्याने आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार रात्री दही खाल्ल्याने कफ होतो, श्वासोच्छवासात अडथळे निर्माण होतात, मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि अस्वस्थता देखील वाटते. रात्रीच्या समयी दही खाणे टाळावे.