नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येणारे ८ गोड पदार्थ- कमी वेळेत करा चवदार नैवेद्य..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 04:18 PM2024-10-04T16:18:48+5:302024-10-04T16:28:53+5:30

नवरात्रीला काही घरांमध्ये नऊ दिवस उपवास असतात तर काही घरांमध्ये दररोज देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

तुम्हालाही नवरात्रीमध्ये देवीसाठी रोज एक वेगळा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून करायचा असेल तर ही घ्या कमीतकमी वेळेत होणाऱ्या चवदार गोड पदार्थांची यादी..(7 most easy and simple recipe for navratri naivedya)

या यादीमधला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे शिरा. शिरा करायला खरंच खूप कमी आणि कमी साहित्य लागते.

बाजारातून विकतचं चक्का दही आणल्यास देवीसाठी तुम्ही अगदी १० मिनिटांत श्रीखंडाचा नैवेद्य करू शकता.

नैवेद्यासाठी करता येण्यासारखा आणखी एक सोपा पदार्थ म्हणजे बासुंदी. आता बासुंदीसाठी दूध आटवायला निश्चितच वेळ लागतो. पण ते गॅसवर एकदा उकळून ठेवलं की त्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नसते.

मखाना खीर हा देखील एक चांगला नैवेद्य आहे. शिवाय तो उपवास असणाऱ्यांनाही चालतो.

देवीसाठी तुम्ही शेवयाची खीर देखील करू शकता. अगदी १५ ते २० मिनिटांत शेवयाची छान खीर करता येते.

मिल्क पावडरचे चवदार पेढे हा नैवेद्यही तुम्ही करू शकता. बाजारात सणासुदीला पेढ्यांमध्ये खूप भेसळ करण्यात येते. त्यामुळे घरच्याघरी तयार केलेले पेढे कधीही चांगले.

शेंगदाण्याचा लाडूही तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता. शिवाय तो खूप पौष्टिकही आहेच..

शेंगदाण्याच्या लाडूप्रमाणे सुकामेवा आणि खजूर घालूनही लाडू करू शकता. हे लाडू तर घरातल्या सगळ्यांसाठीच खूप आरोग्यदायी आहेत.