Friendship Day 2022: अभिनेत्रीची दिल दोस्ती दुनियादारी, कशा झाल्या स्टार अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2022 10:01 AM2022-08-07T10:01:08+5:302022-08-07T10:05:01+5:30

१. दोन मैत्रिणी एकमेकींच्या कधीच बेस्ट फ्रेंड्स होऊ शकत नाहीत.. किंवा दोन सेलिब्रिटी या मैत्रिणी केवळ नावालाच असतात, त्या एकमेकींना कायम पाण्यात पाहतात. असं काय काय आपण त्यांच्याबद्दल ऐकत असतो. पण खरंच तसं असतं का.. कारण या काही ब्रेस्ट फ्रेंड्सच्या जोड्या आपण वर्षानुवर्षांपासून पाहात आहोत, आणि यांची मैत्री पाहून खरंच तसं वाटत नाही. म्हणूनच तर बघा कशी रंगलीये त्यांची यारी दोस्ती...

२. जान्हवी कपूर आणि सारा अली खान. या दोघीही बॉलीवूडच्या नव्या फळीतील दमदार अभिनेत्री.. दोघीही स्टार किड्स. त्यांची दोस्ती एकदम खास आहे. दोघी मिळून बऱ्याचदा ट्रिपला जातात. कधी जीमला सोबत जाताना दिसतात तर कधी शॉपिंगला.

३. करिश्मा, करिना- मलायका, अमृता या चौघींची यारी तर वेगळीच आहे. करिश्मा- करिना आणि आणि मलायका- अमृता या कपूर आणि अरोरा बहिणी बहिणींचं एकमेकींशी असं काही जमतं की अनेकदा चौघीच मिळून विदेशात ट्रिपला जातात, पार्टी करतात, एकमेकींचे वाढदिवस साजरे करून धमाल करतात.

४. सुझेन खान आणि प्रिटी झिंटा यादोघीही अशाच घट्ट मैत्रिणी.. ऋतिक रोशनच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पण त्यानंतर मात्र त्यांनी ती अजूनही टिकवून ठेवली. सुझेन खान प्रिटीची तर मैत्रिण आहेच. पण अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिचीही खूप जवळची मैत्रीण आहे.

५. सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर या स्टारकिड्सची मैत्री तर अगदी बालपणीची. सुहाना शाहरुख खानची लेक, अनन्या चंकी पांडेची कन्या तर शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे.

६. आलिया भट आणि अनुष्का रंजन यांचं गुळपीटही अगदी लहानपणापासूनच. या दोघींची मैत्री इतकी घट्ट की आलियाचं स्टारडम तिच्यात आतापर्यंत तरी डोकावू शकलेलं नाही.

७. नेहा धुपिया आणि सोहा अली खान या दोघींची मैत्री मागच्या अनेक वर्षांपासूनची. मागे एकदा त्यांच्या मैत्रीमध्ये काही खटके उडाल्याच्या घटना कानावर येत होत्या. पण तसं काहीही नसून दोघींचं नातंही अगदी पहिल्यासारखंच आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

८. क्योंकी साँस भी कभी बहु थी पासून सुरू झालेली स्मृती इराणी आणि एकता कपूर यांची मैत्री आजतागायत टिकून आहे. एकमेकींसोबत असणारे त्यांचे व्यावसायिक संबंध कधी मैत्रीमध्ये बदलून गेले, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही.