Singal at 30? तिशी आली तरी ना लग्न ना प्रेमप्रकरण? उदास होण्यापेक्षा करा ७ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:19 PM2022-02-25T17:19:17+5:302022-02-25T18:09:30+5:30

7 simple tips of living your best : तुमचे पैसे सहलींसाठी खर्च करा. तुम्ही मस्त जग फिरा, सोलो ट्रॅव्हल करा, मित्रमैत्रिणींसोबत ट्रिपला जा.. मोकळेपणानं बिधांस्त जगा..

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये नसता, विशेषत: ज्यावेळी तुम्ही वयाची तीशी गाठता तेव्हा असे वाटू शकते की प्रत्येक व्यक्तीचा जोडीदार आहे. आपणचं का सिंगल आहोत. अविवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये न राहणं यात वाईट काही नाही. तुम्ही विचारही केला नसेल तेव्हढे सिंगल राहण्याचे फायदे आहेत. (6 Tips for Living Alone to Help You Enjoy Living Solo)

वयाची ३० ओलांडल्यानंतरही तुम्ही सिंगल असाल तर स्वत:ला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येईल तेव्हाच तुमचं जीवन आनंदी, नाविन्यपूर्ण होईल असा विचार करू नका. त्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगा. (Here's why it's totally okay to be single in your 30s)

कोणालाही न सांगता तुम्ही हवे तितके दिवस तुम्ही बाहेर राहू शकता. जर तुम्हाला एक दिवस सुट्टी घेऊन समुद्रकिनारी जायचे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण जे लोक अविवाहित किंवा कमिटेड आहेत त्यांना पार्टनरच्या वेळापत्रकांबद्दल देखील विचार करावा लागेल, पण सिंगल असाल तर तुम्हाला हवे तसे करू शकता.

तुम्ही आपली खोली हवीतशी ठेवू शकता. अनेकांना खाल्ल्यानंतर वस्तू तिथेच ठेवलेल्या किंवा सिंकमध्ये पडलेली भांडी आवडत नाही अशा स्थितीत वाद होण्याची शक्यता असते. जर तुम्ही एकटे राहत असाल तर हवं तेव्हा आपली खोली स्वच्छ करू शकता, जर एखादेवेळी खोली अस्वच्छ राहिली तरी तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही.

रात्रीच्या जेवणासाठी किंवा स्वत;ला ट्रिट देण्यासाठ तुम्ही स्वत:बरोबर डेट करा. जर तुमच्या परिसरात एखादे नवीन रेस्टॉरंट उघडले असेल ज्याला तुम्ही भेट देऊ इच्छित असाल, तर जा आणि प्रयत्न करा! तुम्हाला नवीन चित्रपट पहायचा असेल तर, थिएटरमध्ये जा आणि आता शो पहा! आपण आपल्या वेळेनुसार आपल्याला पाहिजे ते करू शकता.

तुमच्या करिअरमधील नवीन संधींसाठी स्वत:ला तयार करा. तुम्हाला कामाव्यतिरिक्त कशाचाही विचार करण्याची गरज नाही, परंतु रात्री उशिरा घरी आल्याने तुम्हाला कोणी दोष देणार नाही याचा फायदा घ्या. सेमिनारमध्ये भाग घ्या, अतिरिक्त क्लासेस जॉईन करा आणि तुमच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आवश्यक पावले उचला.

तुमचे पैसे सहलींसाठी खर्च करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या काही मित्रांना तुमच्यासोबत आमंत्रित करू शकता किंवा तुम्ही एकटे जाऊ शकता. जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला हवे ते करू शकता.

अविवाहित लोक नातेसंबंधातील लोकांपेक्षा चांगली झोप घेतात. चांगल्या, आरामदायी पलंगासाठी, उशींसाठी खर्च करा. तुम्ही स्वत:बरोबर वेळ घालवत हवं तितका वेळ आरामशीर झोपू शकता.

अभ्यासानुसार अविवाहित लोक विवाहित लोकांपेक्षा चांगल्या शारीरिक स्थितीत राहतात. तुमचा मोकळा वेळ जिममध्ये व्यायाम करण्यासाठी, जॉगिंगसाठी किंवा पोहायला जाण्यासाठी वापरा. जेणेकरून दीर्घकाळ तुम्ही तरूण, फिट दिसाल