कपड्यांवर पडलेले डाग सहज काढण्यासाठी ७ उपाय, डाग झटक्यात गायब-कष्ट कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 05:27 PM2022-12-07T17:27:47+5:302022-12-07T17:38:25+5:30

Cloth Stain Wash कपड्यांवर पडलेले डाग काढणं हे फार अवघड काम, त्यासाठी हे काही घरगुती उपाय

कपडे धुताना मोठा टास्क म्हणजे हट्टी डाग. काही कपड्यांवरील हट्टी डाग काढताना नाकीनऊ येतात. ते डाग काढता काढता कपड्यांवरील रंग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक महागडे डिटर्जंट पावडर वापरूनही हट्टी डाग निघण्याचं नाव घेत नाही. त्यात जर शाई, तेलकट डाग, कॉफी किंवा चहाचे डाग पडले तर विचारायलाच नको. आपण हे डाग घरगुती साहित्यांचा वापर करून काढू शकतो.

लिंबू आणि मिठाचा वापर आपण कपड्यांवरील डाग हटवण्यासाठी करू शकता. सर्वप्रथम, लिंबूचा रस आणि मीठ समान प्रमाणात एका वाटीत घेऊन चांगले मिक्स करा. दोन्ही घटक चांगले मिक्स झाल्यानंतर ती पेस्ट कपड्यावरील डागावर लावा. यानंतर पेस्ट त्या हट्टी डागावर घासून घ्या. यानंतर १ ते २ तास उन्हात वाळवा. शेवटी कापड पाण्याने स्वच्छ घासून धुवून घ्या.

डाग पडलेला कापड आणि थंड पाण्याने ओला करा. एका साध्या पाण्यात ३ टेबलस्पून बेकिंग सोडा मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा. ही पेस्ट कपड्यावर ३० मिनिटे तशीच राहू द्या. ३० मिनिटे झाल्यानंतर त्यावर लाँड्री डिटर्जंट लावा. त्यानंतर पुन्हा ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर वॉशिंग मशिनमध्ये धुवून वाळवा.

जेवताना कधी कधी भाज्यांचे डाग कपड्यांवर पडतात. काही डाग धुतल्यानंतरही निघत नाही. अशावेळेस व्हिनेगरचा वापर करा. डाग लागलेल्या भागावर व्हिनेगर लावा, साधारण ३० मिनिटे व्हिनेगर तसेच राहू द्या. त्यानंतर कपडा चांगला घासून काढा. अशाने कठीण डाग निघण्यास मदत होईल.

कपड्यावर जर शाईचे डाग पडले असेल तर टॉमेटो ते डाग काढण्यास मदत करेल. टॉमेटोचे काप करा त्यावर मीठ लावा. आणि टॉमेटो डागांच्या भागावर चांगले घासून घ्या. अशाप्रकारे डाग निघून जाईल.

चहाचे डाग खूप हट्टी असतात. ते काढण्यासाठी बटाटे उकडून घ्या. उकडलेल्या बटाट्याचे पाणी आपण चहाचे डाग काढण्यासाठी वापरू शकता. बटाट्याच्या पाण्यात डाग असलेले कपडे भिजवून ठेवावे. काही काळ तसेच राहू दिल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवावे.

पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. या दोन्ही गोष्टी एकत्र करून डागांच्या भागावर लावा. याने कपडे चांगले निघतील.

आता आपण घरगुती पद्धतीने पेंटचे डाग घालवू शकता. हे डाग काढण्यासाठी रॉकेलचा वापर करा. जिथे डाग असेल तिथे थोडे रॉकेल तेल टाकून चांगले घासा. नंतर कोमट पाण्याने कपडे धुवा.