सुटलेलं पोट कमी करायचंय? रोज फक्त १० मिनिटं करा एक काम, पाहा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 05:14 PM2023-05-29T17:14:03+5:302023-05-29T19:21:42+5:30

7 Yoga Asanas To Reduce Belly Fat पोटावरची वाढलेली चरबी कमी करायची तर काढा फक्त १० मिनिटं वेळ; नियमित करा ७ योगासने

बैठं काम, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यांमुळे पोटाची चरबी कधी लटकायला लागते लक्षातही येत नाही. मात्र ती वेळीच कमी करायची तर १० मिनिटं वेळ काढून काही योगासने आवर्जून करायला हवीत (7 Yoga Asnas To Reduce Belly Fat) .

फलकासन म्हणजेच प्लँक पोझ हे पोटाच्या स्नायूंना ताण पडण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आसन आहे. बॉडी बॅलन्स करायची असल्याने हात, खांदे, तळवे आणि पोट यांचा भार पोटावर येतो आणि त्याठिकाणची चरबी कमी होण्यास मदत होते.

नौकासन हे पोट कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे आसन आहे. यातही पार्श्वभागावर संपूर्ण शरीराचा भार पेलला जात असल्याने हे आसन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

अधोमुखश्वानासन हे वाढलेले पोट कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे आसन आहे. कंबर, पाय, मांड्या यांवर ताण पडून चरबी घटण्यास मदत होते.

भुजंगासन केल्यावर आपल्या पाठीच्या आणि पोटाच्या तसेच खांदे-मान या सगळ्या स्नायूंना ताण पडत असल्याने पोट कमी करण्यासाठी हे आसन नियमित करायला हवे.

पवनमुक्तासनात पोटावर ताण पडत असल्याने पोटात साचून राहिलेले वायू बाहेर पडण्यास मदत होते आणि नकळत पोट कमी होते.

उष्ट्रासन हे दिसताना सोपे दिसत असले तरी करताना आपल्या संपूर्ण शरीरावर एकप्रकारचा ताण येतो. त्यामुळे चरबी कमी होण्यासाठी हे आसन आवर्जून करायला हवे.

पश्चिमोत्तानासन या आसनात पोटावर दाब पडतो आणि त्यामुळे चरबी घटणे सोपे होते. सुरुवातीला काही सेकंद आणि नंतर काही मिनीटे हे आसन टिकवल्यास चांगला फायदा होतो.