चवीपुरतं मीठ यापलिकडे मिठाचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहितीच नसतील, पाहा चिमूटभर मीठ अनेक कामं करते सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 19:01 IST2025-04-17T11:12:15+5:302025-04-17T19:01:28+5:30

कोणत्या पदार्थात किती प्रमाणात आणि कसं मीठ घालावं, हे आपल्याला माहिती आहे. पण मीठ फक्त खाण्यासाठीच वापरू नका. कारण स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत कित्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठी मीठ उपयुक्त ठरते (8 different salt hacks). त्यापैकी काही उपयोग आपण पाहूया जे आपल्याला रोजच्या कामांमध्ये खूपच उपयोगी ठरतील.(cleaning tips using salt)
प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाटल्यांमधून वास येत असेल तर त्या बाटलीमध्ये थोडेसे मीठ टाकून ठेवा आणि १० मिनिटांनंतर बाटली धुऊन घ्या. बाटलीतली दुर्गंधी जाईल.
जर घरात मुंग्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी थोडे मीठ टाकून ठेवा. जिथे जिथे मीठ टाकाल तिथून तिथून मुंग्या गायब होत जातील.
सिंक किंवा बेसिनमधून घाण वास येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी थोडेसे मीठ टाकून ठेवा. सकाळपर्यंत सिंकमधली दुर्गंधी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असेल.
रात्री झोपण्यापूर्वी टॉयलेटच्या भांड्यावर मीठ टाकून ठेवा. भांड्यावरचे पिवळट- काळपट डाग आणि दुर्गंधी कमी होण्यासाठी मीठ उपयुक्त ठरतं.
मीठ घातलेल्या गरम पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवल्यास शारिरीक आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते आणि रिलॅक्स वाटते.
आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ घालून आंघोळ केल्यास आखडून गेलेलं अंग मोकळं होण्यास मदत होते.
तळून झाल्यानंतर कढईवर जर तेलाचे पिवळट, काळपट, करपलेले डाग पडले असतील तर त्या डागांवर थोडंसं मीठ घाला. त्यानंतर कोणतंही डिशवॉश लिक्विड घ्या आणि कढई घासणीने घासून काढा. डाग अगदी स्वच्छ निघून जातील.
हा उपाय बहुतांश लोकांना माहितीच आहे. तो म्हणजे घशात खवखव असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे. यामुळे घसादुखीचा, खोकल्याचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो.