8 food items that are important for the health of liver, Food for liver health
लिव्हरचं आरोग्य उत्तम ठेवणारे ८ पदार्थ, तरुण वयातच नियमितपणे खा म्हणजे चाळिशीनंतर फिट रहाल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 08:25 AM2022-10-09T08:25:34+5:302022-10-09T08:30:02+5:30Join usJoin usNext १. लिव्हर, हार्ट यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आता तरुण वयातच आहाराची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. कारण या अवयवांच्या आजाराचा आणि वयाचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. कमी वयातच वेगवेगळे आजार गाठत आहेत. त्यामुळेच लिव्हरचं आरोग्य सांभाळण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असायला पाहिजेत, याची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रित कारला यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना दिली. २. बीटरुट- यामध्ये भरपूर प्रमाणात न्युट्रीयंट्स असतात. तसेच फायबर, फोलेट, मँगनिज, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी देखील असते. या घटकांमुळे लिव्हरचा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्याची लिव्हरची क्षमता वाढविण्यासाठी उपयोग होतो. ३. ग्रीन टी- जापनिज अभ्यासानुसार दररोज सायंकाळी ४ ते ५ दरम्यान एक कप ग्रीन टी घेतल्यास लिव्हरसाठी होणारा रक्तपुरवठा अधिक उत्तम पद्धतीने होतो. ४. ऑलिव्ह ऑईल- ऑलिव्ह ऑईलमुळे लिव्हरमधील फॅट्स विरघळण्यास तसेच रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. ५. कोबीवर्गीय भाज्या- ब्रोकोली, फ्लॉवर, पत्ताकोबी अशा भाज्या नियमित खाल्ल्यास लिव्हरचे कार्य अधिक उत्तम होते, तसेच लिव्हरमधील चांगले एन्झाईम्स वाढण्यास मदत होते. ६. अक्रोड- रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड सकाळी खाल्ल्यास लिव्हरचे आरोग्य उत्तम राहते. फॅटी लिव्हर ॲसिड कमी करण्यासाठी अक्रोडचा उपयोग होतो. ७. हळद- हळददेखील लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाव टेबलस्पून हळद आणि २५० मिली पाणी हे मिश्रण उकळून असा हा हळदीचा काढा दुपारी ४ च्या सुमारास घ्यावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. ८. लिंबू- रोजच्या जेवणातील लिंबाचा वापरही लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरतो. ९. सफरचंद- बॉडी डिटॉक्स करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. यासाठी दररोज सकाळी ११ च्या सुमारास एक सफरचंद खावे.टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नWeight Loss TipsHealthHealth Tipsfood