पाेटावरची चरबी कमी करणारे ८ पदार्थ, बेली फॅट नको असेल तर हे पदार्थ नियमित खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 03:27 PM2022-08-18T15:27:13+5:302022-08-18T15:31:51+5:30

१. पोटावरची वाढती चरबी ही अनेकांच्या पुढची अडचण. बाकी शरीर शेपमध्ये असतं. पण पोटावरची चरबी मात्र दिवसेंदिवस सुटतच जाते. व्यायाम करणे हा यावरचा उपाय तर आहेच. पण त्यासोबतच आहारात जर पुढील काही पदार्थ नियमितपणे घेतले, तर नक्कीच त्याचा उपयोग पोटावरची चरबी कमी करण्यासाठी होईल.

२. चेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, टरबूज, सफरचंद अशा लाल रंगाच्या फळांमध्ये असणारे काही घटक पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जे मिळेल ते लाल रंगाचे फळ दिवसातून एकदा तरी खावं.

३. Nutrition Journal यांच्या रिपोर्टनुसार ॲव्हाकॅडो दुपारच्या जेवणात घेतलं तर त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्याशिवाय यात असणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड तळलेल्या पदार्थांपासून शरीरात तयार झालेले ओमेगा ६ फॅट्स कमी करण्यासाठी मदत करतात.

४. ब्राऊन राईसमध्ये असणारे मॅग्नेशियम आणि क्रोमियम कोर्टीसॉल हा स्ट्रेस हार्मोन नियंत्रित ठेवतात. त्यामुळे इन्सुलिन आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रियाही मर्यादित राहते.

५. ओट्स आणि बीन्स हे देखील पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जो फायदा ब्राऊन राईस खाल्ल्याने होतो, तोच फायदा ओट्स आणि बीन्सद्वारे मिळतो.

६. हिरव्या पालेभाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे शरीरात जलद ग्लुकोज तयार होत नाही. शिवाय या भाज्यांमध्ये असणारे पॉलीफिनॉल आणि मायक्रोन्युट्रियंट्स चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करतात.

७. दालचिनी खाल्ल्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे नियमितपणे थोडी दालचिनी तरी आहारात घेतलीच पाहिजे. दालचिनी घातलेला चहा मसाला केला आणि तो रोज दिवसातून एकदा चहामध्ये चिमुटभर टाकला तरी उत्तम.

८. Louisiana State University यांच्या अभ्यासानुसार डार्क चॉकलेट खाण्याने शरीरात तयार होणारे पदार्थ अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात

९. ऑलिव्ह ऑईल शरीरातील हंगर हार्मोन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपोआपच भुकेवर नियंत्रण येते आणि आहार कमी प्रमाणात घेतला जातो.