छोट्या केसांसाठी ८ युनिक हेअरस्टाईल्स; करायला सोप्या, गेटअप दिसेल स्टायलिश, सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:17 PM2023-01-30T13:17:20+5:302023-01-30T13:40:54+5:30

8 Hairstyles for Short Hair : वेण्यांनी सजवलेल्या केसांसह साईड बन तुम्हाला साडीवर युनिक लूक देऊ शकतो.

केस लहान असतील तर कोणत्या हेअरस्टाईल्स करता येतील हा प्रश्न पडतो. अनेक सेलिब्रिटीज आपल्या शॉर्ट हेअर्सवर वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांचे काही लूक तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. केसांना बारीक फुलं लावून तुम्ही लूक खूलवू शकता. मोगऱ्याचा गजरा, गुलाब, चाफा किंवा तुम्हाला आवडत असलेली आर्टिफिशियल फुलं तुम्ही केसांवर लावू शकता.

लहान आणि लांब केसांसाठी वेणी हे भारतीय केशरचनांचे सर्वात प्रतिष्ठित वैशिष्ट्य आहे. एक बाजचे केस पूर्णपणे उजव्या बाजूला घेऊन तुम्ही डाव्या बाजूला वेणी घालू शकता. एका बाजूला वेणी आणि दुसऱ्या बाजूला मोकळे केस तुमचं सौंदर्य खुलवतील.

लांब केसांपेक्षा शॉर्ट हेअरर्सना हेअरबॅण्ड्स शोभून दिसतात. तुम्ही केसांना चांगला शेप देण्यासाठी हेअरबॅण्ड वापरू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबॅण्ड्स उपलब्ध आहेत. त्यांच्या वापरानं तुमचा लूक अधिक सुशोभित दिसेल.

चिग्नॉन हा कमी फॅन्सी बन आहे जो कोणत्याही औपचारिक किंवा पारंपारिक प्रसंगी स्टाईल केला जाऊ शकतो. हा बन तुम्ही सिंपल ठेवू शकता किंवा प्रसंगानुसार एक्सेसरीज जोडू शकता.

जर तुमचे केस लहान असतील मेसी बन ऑफिस लूक असो किंवा पारंपारीक सणासुदीचा लूक प्रत्येक प्रसंगी तुम्ही सुंदर आणि उठून दिसाल.

दोन्ही साईडनी वेण्या घालून मागे बॉबी पिन्सच्या मदतीनं लॉक करायच्या आणि मागे सिंपल बन बांधायचा.

वेण्यांनी सजवलेल्या केसांसह साईड बन तुम्हाला साडीवर युनिक लूक देऊ शकतो.

केस साधे, सरळ मोकळे ठेवलेली केशरचना हा आकर्षक दिसण्याचा उत्तम मार्ग आहे. हा लूक कॅरी करणं खूपच सोपं आहे.