दह्यापेक्षा जास्त चांगले ८ प्रोबायोटिक पदार्थ, उन्हाळ्यातले गॅसेस-पोट डब्ब होणं होईल बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 17:34 IST2025-04-03T17:02:22+5:302025-04-03T17:34:54+5:30
Best probiotic foods for digestion: Probiotic foods better than yogurt: Natural probiotics for gut health: Summer foods for bloating relief: How to reduce gas naturally: Fermented foods for gut health: Stop bloating with probiotics: दह्यापेक्षाही आणखी ८ पदार्थ असे आहेत ज्यांच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारु शकते.

उन्हाळा सुरु झाला की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या काळात गॅस, अॅसिडिटीची समस्या अधिक वाढते. आपल्या आतड्यांमध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी हे बॅक्टेरिया महत्त्वाची भूमिका बजावतात. (Best probiotic foods for digestion)
पोटाचे आरोग्य बिघडल्यानंतर आपण अनेक औषधे घेतो. काहीही खाल्ल्यानंतर अन्न नीटसे पचत नाही, ढेकर येणे, अॅसिडीटीचा त्रास आणखी वाढतो. यासाठी आपण आहारात दह्याचा समावेश करतो. प्रोबायोटिक वाढवण्यासाठी दही चांगले मानले जाते. परंतु, दह्यापेक्षाही आणखी ८ पदार्थ असे आहेत ज्यांच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारु शकते. (Probiotic foods better than yogurt)
बकरी, मेंढी किंवा गाईच्या दुधापासून बनवलेले ग्रीक योगर्ट हा प्रोबायोटिक्स समृद्ध आहे. यात असणारे घटक आतडे, हाडे आणि हृदयाच्या आरोग्याला पुरक ठरते.
केफिर हा आंबवलेला पदार्थ आहे. केफिर हे दह्यासारखेच पेय असून त्यात प्रोबायोटिक स्ट्रेन जास्त असते. ज्यामुळे हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला आहे.
किमची हा पारंपरिक कोरियन आंबवलेल्या भाजीपाल्यापासून बनवला जातो. यामध्ये लैक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. जे पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि आतड्यातील सूक्ष्मजीवला सुरळीत करतात.
सॉरक्रॉट हा पदार्थ बारीक चिरलेल्या आणि आंबवलेल्या कोबीपासून बनवला जातो. यात फायबर आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आतड्यातील विविध सूक्ष्मजीवांना चालना मिळते.
मिसो हा जपानी पदार्थ आहे. सोयबीनची पेस्ट तयार करुन आंबवली जाते. ती एस्परगिलस ओरिझा आणि विविध जीवाणूंच्या मदतीने तयार करतात. ज्यामुळे शरीरात चांगले प्रोबायोटिक तयार होतात.
कोम्बुचा हा आंबलेला चहा आहे. ज्यामध्ये प्रोबायोटिक्सचा समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टचे प्रमाण असते ज्यामुळे पोटाला आराम मिळतो.