भाऊबीज स्पेशल : ८ असे पदार्थ की खाऊन भाऊ बहिण होतील खुश, सण होईल स्पेशल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 01:23 PM 2023-11-15T13:23:01+5:30 2023-11-15T13:30:34+5:30
8 Recipes You Can Make In Under 30 Minutes To Pamper Your Brother With This Bhai Dooj! : भाऊबीज सणानिमित्त भावासाठी तयार करा खास ३० मिनिटात ८ चविष्ट पदार्थ.. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी (Diwali). भारतात दिवाळी हा सण ५ दिवस साजरा होतो. या ५ दिवसात भाऊ-बहिणीचा पवित्र सण भाऊबीज (Bhaubeej) देखील साजरा होतो. भाऊबीजेच्या शुभ दिवशी भावाला औक्षवण करण्याची परंपरा आहे. शिवाय भाऊ-बहिण एकमेकांना विशेष भेटवस्तू देतात. हे अतूट नातं कायम अबाधित राहण्यासाठी एकमेकांना साथ देण्याचेही वचन देतात. मुख्य म्हणजे बहिण भावासाठी खास पंचपकवान तयार करते. या दिवसात बहिण भावाच्या जिभेचे चोचले पुरवते. जर आपल्याला या सणानिमित्त खास पदार्थ तयार करायचे असतील तर, हे पदार्थ (Special Dishes) आपल्यला भावासाठी खास करून पाहा(8 Recipes You Can Make In Under 30 Minutes To Pamper Your Brother With This Bhai Dooj!).
रव्याचा गोड शिरा अनेकांना आवडतो. रवा, साखर, दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करून तयार करण्यात येणारा हा पदार्थ चवीला खूप भन्नाट लागतो. जर आपल्याला या दिवशी भावासाठी काही स्पेशल पदार्थ करायचं असेल तर, गोड मऊ शिरा तयार करा.
शाही तुकडा नावाप्रमाणेच चवीलाही शाही असतो. तुपात तळलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर रबडी किंवा बासुंदी दूध घालून खाल्ले जाते. शिवाय त्यावर आपण ड्रायफ्रुट्स देखील सजवून डिश सर्व्ह करू शकता. या डिशमुळे आपला भाऊ नक्कीच खुश होईल.
बऱ्याच जणांना मिल्क शेक आवडते. जी चवीला तर उत्कृष्ट लागतेच, शिवाय हेल्दीही मानली जाते. जर आपला भाऊ फिटनेस फ्रिक असेल तर, त्याच्यासाठी खास विविध फळांचे ज्यूस किंवा शेक तयार करून द्या.
जर भावाला खीर आवडत असेल तर, त्याच्यासाठी खास शेवयाची खीर तयार करा. दुधात शिजवलेली शेवया तोंडात टाकताच जिभेची चव वाढवते. आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील अॅड करू शकता.
जर आपला भाऊ वयाने लहान असेल तर, त्याच्यासाठी खास ब्रेड चॉकलेट शिरा तयार करा. मुलांना चॉकलेट फार आवडतात. आपण ब्रेड तुपात तळून, दुधात कुसकरून, त्यात चॉकलेट मिक्स करून शिरा तयार करू शकता.
स्नॅक्समध्ये बऱ्याच जणांना ब्रेड पकोडा खायाला आवडते. आपण सांयकाळच्या स्नॅक्समध्ये भावासाठी खास ब्रेड पकोडा तयार करू शकता. आत बटाटा भाजीचं स्टफिंग बाहेर ब्रेडवर बेसनाची कोटिंग ज्यामुळे ब्रेड पकोडा अधिक कुरकुरीत होतो.
काहींना भेंडीची भाजी आवडत नाही. भाजी खाताना अनेक जण नाक मुरडतात. पण भावाला भेंडीची भाजी आवडत नसेल तर, त्याच्यासाठी खास कुरकुरीत भेंडी तयार करा. त्याला ही डिश नक्कीच आवडेल.
जर आपला भाऊ पिझ्झा खाण्याचा शौकीन असेल तर, यंदाच्या भाऊबीजेनिमित्त त्याच्यासाठी खास मिनी पिझ्झा तयार करा. जर आपल्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर, आपण ही डिश पॅनमध्ये देखील तयार करू शकता. रंगीबेरंगी भाज्यांनी सजवून पिझ्झा तयार केल्यास भाऊराया पिझ्झा काही मिनिटात फस्त करेल.