८ चमचमीत चटण्या झटक्यात वाढवतील जेवणाची लज्जत! तोंडाला येईल चव; खा दोन घास जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 02:32 PM2022-12-28T14:32:11+5:302022-12-28T14:42:18+5:30

8 Types of Chutneys चटणी म्हणजे केवळ तोंडी लावणं नव्हे, आजच्या काळात मायक्रो न्यू्ट्रिशंट म्हणूनही त्यांचं महत्त्व मोठं आहे.

ताटातील जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लोणचे, पापड, चटणी, सॅलेड घेतो. तोंडी लावण्यासाठी हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवते. घरात विविध चटणी बनवली जाते. त्याने तोंडाची चव वाढते. मात्र, घरात बनत असलेली तीच तीच चटणी खाऊन कंटाळला असाल, तर या ७ चटणी ट्राय करा. घरातील सदस्यांना ही चटणी नक्की आवडेल.

शरीरातील मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीत स्थिरता आणण्यासाठी अॅव्होकॅडोचे सेवन फायदेशीर ठरेल. आपण अॅव्होकॅडो चटणीच्या स्वरूपात खाऊ शकता. याची चटणी शरीरासाठी किफायतशीर आहे. यासह चवीला उत्तम चविष्ट.

लसूण खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. लसूण सामान्यतः डाळी आणि भाज्यांमध्ये वापरला जातो, परंतु त्याची चटणी अप्रतिम लागते. आपण याची चटणी अगदी सोप्या स्टेप्सने बनवू शकता.

टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण आपण कधी टोमॅटो आणि खजूर मिक्स चटणी करून पाहिली आहे का? टोमॅटो खजुराची चटणी स्नॅक्ससोबत खायला अप्रतिम लागते.

आपण अनेकदा पापड किंवा मसाला पापड जेवणासोबत खाल्लं असेल. परंतु, पापडची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? पापडची चवीला उत्तम आणि कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आणि झटपट देखील बनते.

एक चटणी आपल्या बोरिंग पदार्थाला चव आणते. साऊथ इंडियन डिशसोबत खाल्ली जाणारी नारळ चटणी देखील प्रत्येक पदार्थात फिट होते. आपण ही चटणी घरात साठवून देखील ठेऊ शकता.

हिवाळ्यात पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण ग्रीन चटणी ट्राय करू शकता. हिरवी कोथिंबीर आणि मिरचीपासून तयार ही चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. गरमागरम पराठ्यांसोबत ही चटणी आणखी छान लागते.

शेंगदाण्याचे सेवन केल्याने शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही नियंत्रित राहते. शेंगदाण्याची चटणी आपण दररोज जेवणासोबत खाऊ शकता. ही चटणी चवीला उत्तम आणि झटपट बनते. आपण ही चटणी पराठे, पकोडे अथवा पुलावसह देखील खाऊ शकता.