जागतिक वडापाव दिन : चमचमीत टेस्टी वडापावचे ८ प्रकार, सांगा तुम्हाला कोणता आवडतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 12:27 PM2023-08-23T12:27:03+5:302023-08-23T12:35:51+5:30

Yummy Vada Pav Variants From Mumbai We Are Craving For मुंबईची जान म्हणजेच वडा पावला द्या फ्युजन तडका, ट्राय करा ८ प्रकारचे हटके वडा पाव..

गरमागरम वडापाव म्हणजे मुंबईकरांचं जीव की प्राण. एक वडा पाव खाल्ल्याने पोट गच्च भरते. फक्त मुंबईतच नाही तर, जगभरात वडापाव खाणाऱ्यांची क्रेज पाहायला मिळते. वडा पाव फक्त भूक भागवण्यापुरता मर्यादित राहिला नसून, खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवणारा किंग मेकर ठरला आहे. दर पाच मैलावर भाषा बदलते. त्याचप्रमाणे वडा पाव करण्याची पद्धत आणि चव देखील बदलते. काही वडा पाव आपल्या बटाट्याच्या सारणामुळे फेमस आहे तर, काही वडा पाव त्याच्यासोबत मिळणाऱ्या ओल्या - सुक्या चटणीसाठी चर्चित आहे. जागतिक वडा पाव दिनानिमित्त आपण वडा पावचे ८ प्रकार पाहूयात. नेहमीचा क्लासिक वडा पाव करण्यापेक्षा त्याला जरा हटके ट्विस्ट देऊन पाहा(Yummy Vada Pav Variants From Mumbai We Are Craving For).

दादरमधील अशोक वैद्य या मराठमोळ्या व्यक्तीने वडा पावचा शोध लावला. ओरीजनल वडापावची चव खरंतर विसरणं कठीणच आहे. कितीही वडा पावला फॅन्सी रूप देण्याचा प्रयत्न केला तरी, लोकांची पसंती क्लासिक वडा पाव खाण्यासाठी वळते. गरमागरम बटाटा भाजीचं सारण, त्यावर बेसनाचं जाडसर लेअर, सोबत पाव आणि चटणी. साधारण १५ रुपयात पोट भरून जाते.

सध्याच्या पिढीला चीज खाण्याचं वेड आहे. बर्गरमध्ये ज्याप्रमाणे चीजचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वडा पावमध्ये देखील चीजचा वापर केला जातो. मुंबईत चीज बर्स्ट वडा पाव फार फेमस आहे. आपण आजच्या दिनी चीज बर्स्ट वडा पाव नक्की ट्राय करून पाहू शकता.

आपल्या सर्वांच्या फेवरीट वडा पावला जर हटके ट्विस्ट द्यायचं असेल तर, पावाला पाव भाजीची भाजी लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या. पाव भाजी खाताना, हॉटेलमधील आचारी पावाला ज्याप्रमाणे भाजी आणि बटर लावून भाजून देतो. त्याचप्रमाणे पावाला भाजी लावून भाजून घ्या. यामुळे वडा पाव आणखी चविष्ट लागेल.

वडा पावला चटकदार ट्विस्ट द्यायचं असेल तर, पावाला मसाला लावून भाजून घ्या. आपण वडा पाव करतानाही त्यात विविध मसाले मिक्स करू शकता. यामुळे वडा पावची चव आणखी दुपट्टीने वाढेल. पाव भाजण्यासाठी मसाले तयार करताना आपण पाव भाजी मसाल्याचा देखील वापर करू शकता.

काही ठिकाणी वडा पावला उलटा ट्विस्ट देण्यात येतो. आता तुम्ही म्हणाल उलटा ट्विस्ट म्हणजे काय? काही स्टॉलवर पावावर बटाटा भाजीचं सारण लावून त्याला बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून तळले जाते. काही लोकं पावाला आधी चटणी लावतात, आणि मग बटाटा भाजी लावून तळतात. त्यामुळे याला पाव वडा असे म्हणतात. किंवा उलटा वडा पावही म्हणतात.

वडा पाव सर्व्ह करताना काही लोकं सोबत चटणी, तळलेल्या हिरव्या मिरच्या, कैरी किंवा सुकी चटणी देतात. आपण वडा पावसोबत मक्याचा चिवडा खाऊ शकता. तळलेल्या मक्यात आपण बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कैरी मिक्स करून खाऊ शकता. या चिवड्यामुळे वडा पाव खाण्यात आणखी मज्जा येईल.

लहान मुलं वडापावप्रमाणे इन्स्टंट नूडल्स देखील तितकेच चवीने खातात. वडा पाव आणि इन्स्टंट नूडल्सचं फ्युजन तयार करायचं असेल तर, इन्स्टंट नूडल्स बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून, इन्स्टंट नूडल्स वडापाव तयार करा. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असा हा पदार्थ टेस्टी लागेल.

सध्या चीज खाणाऱ्यांचा खवय्यावर्ग वाढत चालला आहे. जर आपल्याला चीज लोडेड वडा पाव खायचं असेल तर, चीज फॉनडू वडापाव नक्की ट्राय करून पाहा. यासाठी झणझणीत मिनी वडा पाव तयार करा. एका बाऊलमध्ये मेल्ट चीज घ्या. एका स्टिकला चटणी लावलेला पाव आणि मिनी वडा घेऊन मेल्ट केलेल्या चीजमध्ये बुडवून खा. चीज प्रेमींसाठी चीज फॉनडू वडापाव म्हणजे पर्वणीच ठरेल, यात काही शंका नाही.