वयात अंतर मोठं पण संसार सुखाचा! पाहा सेलिब्रिटी कपल ज्यांच्या नात्यात ‘वय’ आलं नाही, उलट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 02:15 PM2024-07-22T14:15:57+5:302024-07-22T14:26:25+5:30

9 celebrity couples with the largest age gap relationships : वयात अंतर असलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांची रोमॅण्टिक गोष्ट.

वय म्हणजे फक्त एक आकडा. प्रेमात पडल्यानंतर वय, रंग किंवा इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत (Relationship). लग्न करताना अनेकजण म्हणतात की दोघांच्या वयात फार अंतर नको (Age gap). पण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली आणि अत्यंत सुखाचा संसार करणारी काही जोडपी पाहा, त्यांच्या वयात १० ते २० वर्षांचंही अंतर आहे. पण त्यांचा संसार आणि केमिस्ट्री मात्र अतिशय सुंदर आहे(9 celebrity couples with the largest age gap relationships).

करिना कपूर आणि सैफ अली खान. त्यांनी २०१२ साली लग्नगाठ बांधली. सैफ अली खान करिना कपूरपेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. सैफने अमृता सिंगशी लग्न केले तेव्हा करिना केवळ ११ वर्षांची होती.

अभिनेता संजय दत्तने तीन लग्न केली २००८ साली मान्यतासोबत लग्नगाठ बांधली. मान्यता संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर व मीरा राजपूत बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. या दोघांचे अनेक रील्स सोशल मीडियात व्हायरल होतात. या दोघांमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा. हे जोडपं बॉलीवूडचे क्यूट कपल म्हणूनही ओळखले जाते. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. दोघांनी २०१२ साली लग्न केले.

कबीर बेदीने ४ लग्न केली. त्यांनी २०१६ साली परवीन दुसांजशी लग्न केले. परवीन दुसांज ही त्यांची चौथी पत्नी आहे. कबीर बेदी यांचे पहिले लग्न झाले तेव्हा परवीन अवघ्या ६ वर्षांच्या होती. परवीन दुसांज कबीर बेदी यांच्यापेक्षा २९ वर्षांनी लहान आहे.

'शोले' चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी अनेकांची फेवरिट आहे. दोघांनी १९८० साली लग्न केलं. या दोघांमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे.

प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांनी चार विवाह केले होते. त्यापैकी लीना चंदावरकरही त्यांची चौथी पत्नी. लीना किशोर कुमार यांच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान.

अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्यात १८ वर्षांचे अंतर आहे. त्यांची लव्हस्टोरी देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे.

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर मराठीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. दोघांमध्येही १० वर्षांचे अंतर आहे.