नवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खा, रेसिपीही झटपट-साबुदाणा खिचडीला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 01:52 PM2024-10-03T13:52:23+5:302024-10-03T16:26:52+5:30

9 Navratri Special Food You can have While Fasting : नवरात्रात ९ दिवस उपवास म्हणजे पदार्थही वेगवेगळे आणि झटपट करायलाच हवेत.

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे (Fasting). बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. अशावेळी उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. काही लोक एक वेळ उपवास ठेवतात (Navratri). तर काही ९ दिवस पूर्ण उपवास करतात (Healthy tips). अशावेळी रोज उपवासाला काय खावं असा प्रश्न पडतो. उपवासाला आपण साबुदाण्याचे पदार्थ खातो. किंवा फळे खातो. पण त्याव्यतिरिक्त हे ९ पदार्थ करून पाहा(9 Navratri Special Food You can have While Fasting).

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi) आपण शक्यतो उपवासादरम्यान खातोच. साबुदाणा खिचडी बऱ्याच जणांना आवडते. यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट अधिक वेळ भरलेले राहते. आपण त्यात बटाटे, शेंगदाणे घालून खिचडी तयार करू शकता.

जर आपल्याला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर, साबुदाण्याची खीर करून पाहा. ज्यांना गोड खायला आवडते, त्यांच्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे. साबुदाण्याची खिरीमध्ये आपण दूध, केसर, वेलची पूड, साखर आणि सुका मेवा घालून करू शकता.

साबुदाण्याची खिचडी आणि खिरीनंतर आपण इडलीही ट्राय करून पाहू शकता. उपवासाची इडली अगदी काही मिनिटात तयार होते. साबुदाणा आणि भगरचा वापर करून आपण मऊ लुसलुशीत इडली तयार करू शकता. उपवासाची इडली शेंगदाण्याच्या चटणीसोबत उत्तम लागते.

साबुदाण्याचा डोसा आपण कधी करून पाहिलं आहे का? उपवासाचा डोसाही इन्स्टंट रेसिपी आहे. यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. साबुदाण्याचे पीठ आणि भगरचा वापर करून अगदी काही मिनिटात डोसा तयार होतो.

आपण कधी दही बटाटा करी हा पदार्थ करून पाहिला आहे का? यामध्ये बटाटे उकडून, दह्याची ग्रेव्ही तयार करून ही भाजी केली जाते. आपण ही भाजी उपवासाची इडली किंवा डोश्यासोबत खाऊ शकता.

उपवासादरम्यान आपण भगरचा भात करतोच. जर भात खायचा नसेल तर, आपण वरईचा पुलावही करू शकता. पुलावामध्ये उपवासादरम्यान खाल्ले जाणारे भाज्या घालून आपण हा चमचमीत पुलाव करू शकता.

उपवासादरम्यान जर आपल्याला चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर, आलू चाट करून खा. बटाटे भाजून त्यात मसाले घालून आपण बटाटा चाट करून खाऊ शकता.

उपवासाच्या वेळी मखाणा खीरही खाल्ली जाऊ शकते. उपवासात ऊर्जा कमी वाटत असेल, शिवाय शरीराला पोषण हवं असेल तर, मखाणा खीर करून पाहा. गोड खीर जीभेची चव नक्कीच वाढवेल.

उपवासात बटाट्याचे पराठे खाता येतात. हे पराठे राजगिऱ्याच्या पिठापासून बनवता येते. आपण त्यात बटाट्याचे स्टफिंग भरून बटाट्याचा पराठा करू शकता.