ऑफिसच काय पार्टीसाठीही खास थ्री पिस सूट! नवा फॅशनेबल सुंदर आणि कम्फर्टेबल ड्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 19:50 IST2025-04-24T19:43:19+5:302025-04-24T19:50:02+5:30
A special three-piece suit for the office or even for parties! : हा पॅटर्न एकदा तरी वापराच. मस्त दिसतो आणि कम्फर्टेबलही आहे.

तेच तेच कपडे वापरून कंटाळा येत असेल तर काही तरी वेगळं ट्राय करा. बऱ्याच पॅटर्नचे कपडे आता उपलब्ध असतात. त्यापैकीच एक हटके असा पॅटर्न म्हणजे थ्री पीस सेट.
बऱ्याच विविध प्रकारचे थ्री पिस पॅटर्न मिळतात. त्यापैकी काही ऑफीससाठी वापरायला अगदी मस्त आहेत. तसेच फिरायला जाताना किंवा कार्यक्रमाला जातानाही वापरु शकता.
हा प्रकार कम्फर्टेबल आहे, दिसतो छान तसेच विविध फंक्शन्ससाठी वेगवेगळे पॅटर्न मिळतात. फार महागही नाही सगळीकडे आरामात उपलब्ध आहे.
ऑफीसला जाणाऱ्यांसाठी हा पॅटर्न अगदीच मस्तच आहे. रीच लूक या थ्री पिसला आहे. तसेच या पॅटर्नमध्ये रंगही छान उपलब्ध आहेत. जॅकेट टॉप व पॅन्टचा हा सेट फार कम्फर्टेबल आहे.
थोड्या फंक्शनल लूकसाठी असा थ्री पिस नक्कीच सुंदर दिसेल. कॉटनची पॅन्ट व शॉर्ट टॉपवर जाळीचे जॅकेट सुंदर दिसते.
ऑफीस पार्टी किंवा डेलीसाठी असा वन कलर सुट नक्कीच छान वाटेल. मस्त बॉसी लूक देणारा हा प्रकार विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.
जरा हटके काही प्रकार वापरायचा असेल तर त्यासाठी हा असा ड्रेस कम क्रॉपटॉप सेट दिसायला फारच छान आहे.
कॉटनचा थ्री पिस वापरायला अगदीच कम्फर्टेबल आहे. कॉन्ट्रास मॅचिंग असलेला हा सुट दिसेल तर सुंदरच पण त्वचेला त्याचा फिलही फार छान येईल.