मुलांना मिल्कशेक प्यायला देणं खूपच धोकादायक, होऊ शकतात गंभीर आजार, वाचा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2023 03:53 PM 2023-10-07T15:53:34+5:30 2023-10-07T15:59:00+5:30
बऱ्याचदा आपण आपल्या मुलांना मिल्कशेक प्यायला देतो. फळं आणि दूध असं सगळंच पौष्टिक त्यांच्या पोटात जातं, असा विचार करून त्यांना आग्रहाने मिल्कशेक देतो. पण ते त्यांच्या आरोग्यासाठी मात्र मुळीच चांगलं नाही.
मिल्कशेक प्यायल्याने मुलांना कोणकोणते त्रास होऊ शकतात, याविषयीची माहिती एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी drdimplejangda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बऱ्याच फळांमध्ये malic ॲसिड, tartaric ॲसिड, folic ॲसिड, oxalic ॲसिड, ascorbic ॲसिड, citric ॲसिड असे ॲक्टीव्ह ॲसिड असतात. तसेच काही फळांमध्ये काही ॲक्टीव्ह एन्झाईम्स असतात.
आपण ही फळं जेव्हा दुधासोबत खातो तेव्हा या ॲक्टीव्ह ॲसिडची आणि दुधातल्या लॅक्टीक ॲसिडची चटकन रिॲक्शन होते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. आयुर्वेदानुसार मिल्कशेकला स्लॉ पॉइझन म्हटलं गेलं आहे.
या रिॲक्शनमधून जे काही बायप्रोडक्ट तयार होतात, ते विषारी असतात आणि ते रक्तात मिसळून हळूहळू आपल्या तब्येतीवर, विविध अवयवांवर आणि खासकरून त्वचेवर वाईट परिणाम करतात.त्यामुळे मुलांना मिल्क शेक देणं टाळायलाच हवं..
आंबा, अव्हाकॅडो, केळी ही फळे दुधासोबत दिली तर चालतात. पण त्यांचं प्रमाण मात्र खूपच मर्यादित हवं.