आरोग्य सांभाळा! चहा आणि कॉफी किती वेळानंतर होते खराब? निष्काळजीपणा ठरेल घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:48 IST2025-04-16T11:37:43+5:302025-04-16T11:48:27+5:30
जर तुम्ही खूप वेळ ठेवलेला चहा किंवा कॉफी पित असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. आरोग्यासाठी ते धोकादायक आहे.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही वाफाळलेल्या चहा, कॉफीने होते. पण तुम्हाला माहिती आहे का, चहा किती वेळानंतर खराब होतो किंवा पिण्यास अयोग्य असतो?
जर तुम्ही खूप वेळ ठेवलेला चहा किंवा कॉफी पित असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. आरोग्यासाठी ते धोकादायक आहे.
सर्वप्रथम, हे जाणून घेणं महत्वाचे आहे की ग्रीन टी, दुधाचा चहा, ब्लॅक कॉफी किंवा नॉर्मल कॉफी यापैकी कोणती गोष्ट आधी खराब होते?
ग्रीन टी, दुधाचा चहा, ब्लॅक कॉफी किंवा कॉफी यामध्ये सर्वात आधी खराब होणारी गोष्ट म्हणजे दुधाचा चहा.
६ किंवा ८ तासांनी ग्रीन टी खराब होऊ शकते. विशेषतः जेव्हा ती रुम टेम्परेचरमध्ये ठेवलेली असते.
दुधाचा चहा अवघ्या २ ते ४ तासांत खराब होतो कारण दुधात बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतू वाढतात.
रुम टेम्परेचरमध्ये कॉफी ठेवली असेल तर ४ ते ६ तासांनी खराब होऊ शकते.
ब्लॅक टी ८ ते १२ तासांनी खराब होऊ शकते परंतु जर ती योग्यरित्या साठवली तर ती बराच काळ फ्रेश राहू शकते.
आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही चहामधून चहा पावडर गाळून फ्रीजमध्ये ठेवली तर ती जास्त काळ फ्रेश राहू शकते.
बराच काळ साठवून ठेवलेल्या चहामध्ये बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते ज्यामुळे पोटाच्या समस्या जसं की लूज मोशन आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.