Aishwarya narkar's video about how to do eyebrows at home by our own
ऐश्वर्या नारकर सांगतात इमर्जन्सीमध्ये घरच्याघरी थ्रेडींग करण्याचा मस्त उपाय- प्रत्येकीसाठी उपयुक्त By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2024 05:19 PM2024-12-02T17:19:09+5:302024-12-02T18:35:58+5:30Join usJoin usNext कधी कधी असं होतं की आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला अर्जंट जायचं असतं. पण त्यावेळी मात्र आपल्या आयब्रोज खूपच जास्त वाढल्या आहेत, हे आपल्या लक्षात येतं. काही कारणामुळे त्यावेळी पार्लरमध्ये जाणं अजिबातच शक्य नसतं. अशी वेळ प्रत्येकीवर कधी ना कधी येतेच. तेव्हा असं वाटतं की जर आपल्याला घरच्याघरी आयब्रोज करता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. कारण नुसत्या आयब्रोज केल्या तरी आपला चेहरा खूपच फ्रेश वाटतो. म्हणूनच आता घरच्याघरी थ्रेड वापरून आयब्रोज किंवा थ्रेडींग कसं करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये सुरुवातीला त्यांच्या हातात जसा थ्रेड आहे, तसा आयब्रोज करण्याचा थ्रेड घ्या. त्या दोऱ्याची दोन्ही टोके एकमेकांना जोडा आणि त्यांची गाठ मारा. यानंतर दोन्ही हातांच्या बोटात दोरा अडकवा आणि त्याला एक- दोन पीळ द्या. आता जिथले केस वाढले आहेत, तिथे त्या दोऱ्याचे मधले टोक ठेवा आणि दोन्ही हातांनी दोरा ओढा. अशा प्रकारचे भुवयांच्या आजुबाजुला वाढलेले जास्तीचे केस तुम्ही काढू शकता. हा उपाय तुम्ही घरच्याघरी अप्पर लिप्स करण्यासाठीही वापरू शकता.टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीऐश्वर्या नारकरBeauty TipsHome remedyAishwarya narkar