वजन कमी करायचं? बघा चिमूटभर ओव्याची कमाल! वजन घटविण्यासाठी 'असं' प्या ओव्याचं पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 06:12 PM2024-06-26T18:12:17+5:302024-06-26T18:16:00+5:30

वाढलेलं वजन कमी कसं करायचं किंवा आहे ते वजन नियंत्रणात कसं ठेवायचं, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर लगेचच हा एक सोपा उपाय करून पाहा.

वजन कमी करण्यासाठी दररोज ओव्याचं पाणी पिणं अतिशय फायदेशीर ठरतं. २०१२ च्या Pharmacognosy च्या अभ्यासानुसार असं आढळून आलं आहे की ओव्यामध्ये असणारं थायमॉल हे ॲक्टीव्ह एन्झाईम पचनासाठी उत्तम असणारा गॅस्ट्रीक ज्यूस तयार करतं. त्यामुळे चयापचय क्रिया अधिक उत्तम होते.

ScienceDirect 2011 यांच्या रिपोर्टनुसार जेवणानंतर चिमूटभर ओवा खायचा आणि त्यावर कोमट पाणी प्यायचं. असं केल्यास पचनक्रिया चांगली होते.

ओवा natural appetite suppressant म्हणून काम करतो. म्हणजेच ओव्याचं पाणी प्यायल्याने अधिक काळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी प्यायचं असल्यास एक टीस्पून ओवा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळा आणि कोमट झाल्यानंतर प्या. दिवसाची सुरुवात हे पाणी पिऊन केल्यास वजन भराभर कमी होईल.