मिरर वर्कचे चोली पॅटर्न पाहा! गरबा खेळताना घालावे असे डिझाइन-हजारोंच्या गर्दीत चमकाल इतके भारी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 06:26 PM 2024-10-02T18:26:04+5:30 2024-10-02T18:52:01+5:30
Navratri 2024 : Amazing Mirror Work Blouse Designs To Make Your Every Garba Look Special : Mirror Work Blouse Designs For Garba : मिरर वर्क केलेले डिझायनर ब्लाऊज साडी आणि घागरा दोन्हीसाठी बेस्ट... नवरात्रीत गरबा खेळणं म्हणजे मस्ट आहेच. गरबा खेळायला जाताना वेगवेगळ्या आकर्षक आणि डिझायनर पद्धतीची घागरा - चोली घातली जाते. यासाठी स्त्रिया खूप आधीपासूनच कपड्यांची खरेदी करतात. यात स्टायलिश एकापेक्षा एक स्कर्ट टॉप, चनिया चोली, घागरा चोली विविध प्रकारचे डिझायनर ब्लाऊज आणि जॅकेट किंवा विविध पारंपरिक वस्त्र असे अनेक पर्याय असतात. या घागऱ्यावर शक्यतो वेगवेगळे रंगीबेरंगी धागे आणि मिररचे वर्क (Mirror Work Blouse Designs For Garba) केलेले असते. असे मिरर वर्क केलेले ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मिरर वर्क केलेले असे डिझायनर ब्लाऊज आपण साडी आणि घागऱ्यावर देखील घालू शकतो. यासाठी मिरर वर्क केलेल्या डिझायनर ब्लाऊजचे अनेक ट्रेंडी पर्याय पाहूयात(Amazing Mirror Work Blouse Designs To Make Your Every Garba Look Special).
१. सिम्पल मिरर वर्क ब्लाऊज :- आपण अशा प्रकारचे काळ्या रंगाचे मिरर वर्क असलेले ब्लाऊज खरेदी करु शकता. हे ब्लाऊज आपण साडी आणि घागरा या दोन्हीवरही मॅच करून घालू शकता. या ब्लाऊजच्या नेक आणि बाह्यांच्या कडेला असे मिरर वर्क केलेले असते.
२. जॅकेट स्टाइल मिरर वर्क ब्लाऊज :- हे ब्लाऊज दिसताना तुम्हाला जॅकेट सारखे दिसेल. यावर वेगवेगळ्या रंगाचे धागे आणि छोट्या गोलाकार, त्रिकोणी आकारात मिरर वर्क केलेले असते. हे जॅकेट सारखे दिसणारे ब्लाऊज आपण प्लेन साडी किंवा घागऱ्यावर घालू शकता.
३. मिरर वर्क स्ट्रिप डिजाइन ब्लाऊज :- जर आपल्याला एकदम हटके आणि बोल्ड लूक हवा असेल तर आपण मिरर वर्क असलेले स्ट्रिप डिजाइन ब्लाऊज घालू शकतो. यात ब्लाऊजच्या स्ट्रिप्सला मिरर वर्क केलेले असते. या मिरर वर्क स्ट्रिप डिजाइन ब्लाऊजच्या मागे आपण लटकन देखील लावू शकतो. या बॅक लटकनमुळे आपल्या पाठीला एक सुंदर आणि बोल्ड लूक येईल.
४. स्वीटहार्ट नेक डिजाइन मिरर वर्क ब्लाऊज :- जर तुम्हाला डिप नेक आणि फिटिंगचा ब्लाऊज घालायचा असेल, तर तुम्ही या ब्रॉड डिझाईनचा स्वीटहार्ट स्टाईल नेक डिझायनर मिरर वर्कचा ब्लाऊज घालू शकता.
५. रिअल मिरर विथ मल्टी थ्रेड :- रिअल मिरर विथ मल्टी थ्रेड या प्रकारच्या ब्लाऊज मध्ये मोठमोठ्या आकाराचे मिरर ब्लाऊजवर लावले जातात. याचबरोबर वेगवेगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचे वर्क केलेले असते. या ब्लाऊजवर एकाच वेळी अनेक रंगांच्या धाग्यांचे वर्क केले असल्यामुळे हे मल्टी थ्रेडींग तुमच्या ब्लाऊजला एक वेगळाच लूक देते.
६. मिरर वर्क ट्रेडीशनल चोली :- मिरर वर्क ट्रेडीशनल चोली यात विविध पारंपरिक डिज़ाईन्स असलेले मिरर वर्क केले जाते. पूर्वीच्या पारंपरिक डिझाईन्स या चोलीवर असतात. हे रंगीबेरंगी भरतकाम आणि चमकदार धाग्यांनी डिझाइन केलेले पारंपरिक लूक असणारे ब्लाऊज तुमचा हटके गरबा लूक पूर्ण करू शकतात.
७. क्रॉप टॉप ब्लाऊज :- जर आपल्याला मॉर्डन आणि हटके गरबा लूक हवा असेल तर आपण क्रॉप टॉप घालू शकता. सध्या क्रॉप टॉप ब्लाऊज तरुण मुलींमध्ये खूपच फेमस आहेत. या क्रॉप टॉपमध्ये तुम्हाला गरबा खेळताना अतिशय कम्फर्टेबल वाटेल. या क्रॉप टॉपमध्ये तुम्ही अतिशय ट्रेंडी आणि स्टायलिश दिसाल.
८. हाय नेक मिरर वर्क ब्लाऊज :- हाय नेक मिरर वर्क ब्लाऊज तुम्हाला रेट्रो टच सोबतच तुमच्या घागऱ्याला रॉयल लुक देतो. ज्यामुळे तुम्ही अतिशय ट्रेंडी दिसू शकता. हेव्ही भरतकाम किंवा सिक्वीन्सने डिजाईन केलेले हे ब्लाऊज अगदी आकर्षक दिसतात यामुळे तुमचा गरबा लूक पूर्ण होऊ शकतो.