लालेलाल स्फटिकांचा ड्रेस घालून अमेरिकन रॅपर चालली पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 07:01 PM2023-01-30T19:01:09+5:302023-01-30T19:28:17+5:30

Doja Cat arrived at Schiaparelli’s Paris Fashion Week Show Covered In 30,000 Crystals, Red Paint : अमेरिकन रॅपर डोजा कॅटच्या ड्रेसची फॅशन जगात मोठी चर्चा आहे.

'पॅरिस फॅशन वीक २०२३' मध्ये, अमेरिकन रॅपर डोजा कॅट हीने परिधान केलेला ड्रेस सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. डोजा कॅट हीने 'पॅरिस फॅशन वीक २०२३' मध्ये लाल रंगांची पॅन्ट आणि ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल पासून तयार झालेला ड्रेस परिधान केला होता(Doja Cat arrived at Schiaparelli’s Paris Fashion Week Show Covered In 30,000 Crystals, Red Paint)

'पॅरिस फॅशन वीक २०२३' मध्ये, २७ वर्षीय अमेरिकन रॅपर डोजा कॅट हीने ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल पासून तयार झालेला ड्रेस परिधान केला होता. हा ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल पासून तयार झालेला ड्रेस खूपच शाइन करत होता. अमेरिकन रॅपर डोजा कॅटचा हा लूक बघून नेटकरी हैराण झाले आहेत.

डोजा कॅट हीने परिधान केलेला अनोखा ड्रेस सोशल मिडिया आणि नेटकऱ्यांमध्ये फारच चर्चेत राहिला आहे.

डोजा कॅट हीने परिधान केलेला हा ड्रेस ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल पासून तयार झाला असून हे ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल तिच्या अंगावर चिटकविण्यात आले आहेत. हे ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल तिच्या अंगावर चिटकवून संपूर्ण लूक तयार करण्यासाठी एकूण ५ तासांचा वेळ लागला आहे.

हा संपूर्ण लूक तयार करण्यासाठी डोजा कॅट हीने डोक्यांपासून पायांपर्यंत क्रिमसन कलरमध्ये स्वतःला रंगवून घेतले आहे. क्रिमसन रंगांमध्ये रंगवून घेतल्यानंतर त्याच्यावर स्वारोवस्की क्रिस्टल चिटकवण्यात आले आहेत.

'पॅरिस फॅशन वीक' च्या रॅम्पवर पोहोचल्यावर डोजा कॅटच्या अंगावरील क्रिस्टल अधिक चमूकन दिसावेत यासाठी तिच्या अंगाला क्रिमसन कलर लावल्यानंतर गोल्ड डस्ट लावले गेले आहे. यामुळे तिने परिधान केलेला ड्रेस अजूनच चमकत आहे.

टॅग्स :फॅशनfashion