Anant Ambani Radhika Merchant pre wedding, stunning looks of celebrities in beautiful sarees
अंबानी प्री-वेडिंग : प्रिसिला चान-करिना कपूर ते कियारा अडवानी-पाहा देखण्या सुंदर साड्यांची एक झलक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 03:37 PM2024-03-04T15:37:44+5:302024-03-04T15:54:30+5:30Join usJoin usNext मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव म्हणजे अनंत अंबानी. अनंत आणि राधिक मर्चंट यांच्या जामनगर येथे झालेल्या विवाहसोहळ्यात जगभरातले दिग्गज उपस्थित होते. त्या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचेच कपडे पाहण्यासारखे असले तरी परदेशी पाहुण्यांसह भारतीय अभिनेत्रींने नेसलेल्या साड्या लक्षवेधी ठरल्या... या विवाह सोहळ्यात आपल्या पती आणि मुलीसह उपस्थित असलेल्या इवांका ट्रम्प हिने गोल्डन आणि सिल्व्हर रंगाची सेक्विन साडी नेसली होती. तिची ही साडी मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली होती. मार्क जुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅन यांची जांभळ्या रंगाची फ्लोरल प्रिंटची साडी अतिशय देखणी होती. करिना कपूरने नेसलेली ही चेरी पिंक रंगाची साडी आणि ती साडी नेसण्याची पद्धत दोन्हीही एकदम हटके होतं. करिनाने सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीही डार्क ब्राऊन रंगाची सेक्विन साडी नेसली होती. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिचा काळ्या साडीतला हा लूक स्टनिंग ठरला. बिल गेट्स यांची पत्नी पॉला हिने काळ्या रंगाची ही सुंदर साडी नेसली होती. पेस्टल ग्रीन रंगाच्या थ्रीडी फुलं असणाऱ्या साडीमध्ये माधुरी दीक्षितचं सौंदर्य असं खुलून आलं होतं. शाहरुख खानची लेक सुहाना खान हिनेदेखील पिवळसर छटा असणारी साडी नेसली होती. तिच्या साडीवर भरगच्च मोती, मिरर आणि एम्ब्रॉयडरी केलेलं होतं. या साडीवर ट्यूब ब्लाऊज घातलेल्या सुहानाचा लूक आकर्षक ठरला. बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करत असलेल्य शनाया कपूरने नारंगी रंगाची पटोला साडी नेसली होती. तिच्या साडीच्या ब्रॉकेड काठांवर तसेच ब्लाऊजवर भरगच्च एम्ब्रॉयडरी केलेली होती. या साडीवर तिने हेवी दागिने आणि ग्लॉसी मेकअप केला होता. करिश्मा कपूरचा लूक अतिशय वेगळा ठरला. तिने साडीवर बंदगळा जॅकेट असा एकदम हटके लूक केला होता. गुलाबी सेक्विन साडीत जान्हवी कपूरही अतिशय देखणी दिसत होती. टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सबॉलिवूडअनंत अंबानीमुकेश अंबानीनीता अंबानीfashionsaree drapingStyling Tipsbollywoodanant ambaniMukesh Ambaninita ambani