व्यायामानंतर खूप थकवा येतो? सेलिब्रिटी योगा टिचर अंशुका परवानी सांगतात बदामासह ‘हा’ पदार्थ खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 09:12 AM2024-01-11T09:12:32+5:302024-01-11T15:26:57+5:30

व्यायाम केल्यानंतर खूप थकवा येतो, अंगात काही ताकदत नाही, असं अनेक जणांना वाटतं. तुमचंही असंच होत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेला उपाय करून पाहा....

आपल्याला माहितीच आहे की अंशुका परवानी या आलिया भट, करिना कपूर अशा अनेक सेलिब्रिटींच्या योगा ट्रेनर आहेत. त्यांनी नुकताच व्यायामानंतर काय खावं आणि काय प्यावं, याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

यामध्ये त्या म्हणतात की व्यायाम केल्यानंतर शरीर हायड्रेट करण्याची खूप गरज असते. त्यामुळे सगळ्यात आधी १ ग्लास नारळाचं पाणी प्या. त्यामध्ये असणारी पोषणमुल्ये आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराला भरपूर एनर्जी देतात.

नारळपाणी प्यायल्यानंतर मुठभर बदाम खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात.

तसेच स्नायूंच्या मजबुतीसाठीही बदामामध्ये असणारे काही घटक अतिशय पौष्टिक ठरतात. म्हणूनच व्यायामानंतर स्नायूंना येणारा थकवा घालविण्यासाठी बदाम खावे.

बदाम खाणं त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.

बदामामध्ये व्हिटॅमिन बी२, व्हिटॅमिन ई, मॅग्निशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.