नवरात्रात फक्त ‘हे’८ प्रकारचे झुमके घाला, डिझाइन्स पाहून सगळे म्हणतील-क्या झुमका!! पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 10:00 AM2024-10-03T10:00:02+5:302024-10-03T10:05:02+5:30

Attractive multi Jhumka traditional, best' for Navratri dandiya Earrings : गरबा दांडियासाठी झुमके घ्यायचेत?

सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वानाच नटून थटून राहायला आवडतं (Jhumka). आता काही दिवसांमध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. नऊ दिवसांमध्ये विविध रंगाचे पोशाख आणि ज्वेलरी घालून मुली गरबा - दांडिया खेळायला जातात (Navratri 2024). घागरा आणि डिझायनर ब्लाऊजवर डिझाईनर कानातले शोभून दिसतात(Attractive multi Jhumka traditional, best' for Navratri dandiya Earrings).

सध्या विविध प्रकारचे झुमके बाजारात उपलब्ध आहेत. जर आपल्यालाही फॅशनेबल झुमके ट्राय करायचे आहेत, तर हे ८ प्रकारचे झुमके पाहा. ९ दिवस ८ प्रकारचे झुमके घालून मिरवा. सगळ्यांच्याच नजरा तुमच्या कानावरच पडतील.

काहींना मोराची डिझाईन असलेले कानातले खूप आवडतात. या पद्धतीचे कानातले घातल्यानंतर वेगळाच लूक येतो. शिवाय हे झुमके फार आकर्षक दिसतात.

ज्या महिलांना मोठे किंवा वजनाने थोडे जड असलेले कानातले घालायला आवडतात, अशा महिलांसाठी हे कानातले अगदी उत्तम आहेत. भरगच्च असलेल्या घागरा किंवा ड्रेसवर हे झुमके शोभून दिसतील.

ऑक्सिडाईज कानातल्यांमध्ये हल्ली मोती कॉम्बिनेशन सुद्धा वापरले जाते. तसेच वेगवेगळ्या रंगाचे मणी, खडे झुमक्याचे शोभा वाढवतात.

सध्या बाजारात या पद्धतीचे झुमका सेट ट्रेंडिंगला आहेत. कानातल्यांच्या वरच्या बाजूला काच आणि खाली ऑक्सिडाईजचे मोठ्या आकाराचे झुमके, हे कॉम्बिनेशन अगदी सुंदर दिसते. आपणही हे झुमके ट्राय करू शकता.

चेन झुमक्याची देखील क्रेझ मुलींमध्ये आहे. यामध्ये देखील बरेच प्रकार आहेत. आपण आपल्या पोषाखानुसार चेन झुमका विकत घेऊ शकता.

असे नाजूक झुबके देखील आपल्या लुकला चारचांद लावतात. अशा प्रकारच्या झुबक्यांमुळे कानाची आणि चेहऱ्याची नक्कीच शोभा वाढेल.

मोठ्या डिझाईनचे कानातले आवडत असतील तर, आपण या प्रकारचे डिझाईन वापरून पाहू शकता. लांब कानातले प्रत्येक अकराच्या चेहऱ्यावर शोभून दिसतात.

जर आपल्याला स्टोन वर्कमध्ये झुमके आवडत असतील तर, स्टोन वर्क कुंदन झुमके ट्राय करा. हे झुमके आपण ड्रेस किंवा इतर आउटफिट्सवर ट्राय करू शकता.