त्वचेचं सौंदर्य बिघडवणारे ३ पदार्थ, लगेचच खाणं थांबवा- आठवडाभरातच त्वचेवर येईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 02:38 PM2024-04-18T14:38:01+5:302024-04-18T14:46:21+5:30

त्वचेचं सौंदर्य तेव्हाच खुलून येतं जेव्हा तुम्ही तिला तुमच्या आहारातून याेग्य ते पोषण देता. आहार आणि योग्य पद्धतीने घेतलेली त्वचेची काळजी किंवा स्किन केअर रुटीन यामुळे त्वचेवरची चमक वाढण्यास मदत होते.

आपण जे पदार्थ नेहमी खातो, अशा पदार्थांपैकीच ३ प्रकारचे पदार्थ आपल्या त्वचेचं सौंदर्य कमी करतात. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो पाहिजे असेल तर काही पदार्थ खाणं लगेच बंद करायला हवं

हे ३ पदार्थ कोणते आणि ते त्वचेवर कशाप्रकारे परिणाम करतात, याविषयीचा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही हे पदार्थ खाणं बंद केलं नाही तर कितीही फेशियल किंवा स्किन केअर ट्रिटमेंट करूनही तुम्हाला अपेक्षित ग्लो मिळणार नाही.

यामधला सगळ्यात पहिला पदार्थ आहे प्रोसेस केलेले कोणतेही पॅकफूड. या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात अनहेल्दी सॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही हानिकारक ठरतात. पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन आणि चेहऱ्यावर सूज येणे हे त्रास पॅक फूडमुळे होतात.

त्वचेसाठी हानिकारक ठरणारा दुसरा पदार्थ आहे साखर. फक्त घरातली साखरच नाही तर वेगवेगळ्या कॅण्डी, केक, पेस्ट्री, वेगवेगळे शुगरी ज्यूस यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे तुमचा चेहरा नेहमी सुजलेला आणि डल दिसतो. त्याच्यावरची चमक गेल्यासारखी वाटते.

तळलेले पदार्थही खूप जास्त प्रमाणात खात असाल तर त्वचा खराब होऊ शकते. कारण या पदार्थांमधून अनहेल्दी ऑईल आणि अनहेल्दी फॅट असं दोन्हीही शरीरात जातं. त्यामुळे त्वचेतून तेल स्त्रवण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे त्वचेवरचे ब्रेकआऊट, पिंपल्स, चेहरा सुजल्यासारखा दिसणे असा त्रास होतो.