त्या ४ दिवसांत अजिबात करू नका ५ चुका, तज्ज्ञ सांगतात मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 03:35 PM 2024-11-11T15:35:52+5:30 2024-11-11T17:01:50+5:30
मासिक पाळी सुरु असताना काही गोष्टी करणं कटाक्षाने टाळलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगत आहेत. या गोष्टी नेमक्या कोणत्या हे सांगणारी माहिती योग अभ्यासकांनी theperfecthealthhydkoti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(avoid 5 mistakes during menstruation cycle or periods)
मासिक पाळीच्या दिवसांत जंकफूड तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. कारण हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात वायू निर्माण होतो. त्यामुळे तो संतुलित ठेवण्यासाठी शरीरातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह अधिक प्रमाणात वापरले जातात. या ३ पदार्थांच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव वाढू शकतो. त्यामुळे जंकफूडसोबतच कडधान्ये, सुकामेवा, सलाड खाऊ नये. त्याऐवजी खोबरं, तीळ आणि गूळ खाण्यास प्राधान्य द्यावे.(every woman should avoid 5 things during menstruation)
पाळी सुरू असताना डोक्यावरून आंघोळ करू नये असं म्हणतात. अनेकींना केस धुतल्यावर थकवा जास्त येतो. झोप येते. सर्दीही होते. त्यामुळे मुळातच खूप अशक्तपणा आलेला असेल तर मासिक पाळीत डोक्यावरुन पाणी घेणं टाळावं.
पाळीच्या दिवसांत खूप जास्त व्यायाम करू नये. कारण या दिवसांत शरीर खूप संवेदनशील झालेले असते. त्यामुळे ते जास्त थकते. शिवाय या दिवसांत स्ट्रेस, एन्झायटी, मूड स्विंग, असे त्रास खूप जास्त होत असतात. त्यामुळे या दिवसांत अतिव्यायाम करणं टाळावं.
पाळीच्या दिवसांत शरीर संबंध ठेवावे की नाही हा प्रश्न अनेकींना असतो. पण आधीच आलेला थकवा, पोटदुखी-कंबरदुखी यांचा त्रास. मूड स्विंग्ज आणि मुख्य म्हणजे हायजिनचे मुद्दे. संसर्गाचे भय आणि जर मनात त्याविषयी घृणा असेल तर मासिक पाळीत सेक्स करणं टाळावं.
मासिक पाळीच्या काळात बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड वापरण्यास प्राधान्य द्यावे. कारण एरवी जे पॅड वापरले जातात ते खूप रासायनिक प्रक्रियांमधून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यामधील केमिकल्सचा त्रास होऊ शकतो. शिवाय हे पॅड वेळोवेळी बदलण्याची खूप गरज असते. तासनतास तेच पॅड वापरल्याने जंतूसंसर्ग होऊ शकतो.