अयोध्येत आवर्जून खावेत असे ६ पारंपरिक पदार्थ, साधेपणा आणि चवीचा अनोखा मेळ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 01:17 PM 2024-01-22T13:17:15+5:30 2024-01-22T14:14:55+5:30
Ayodhya ram mandir famous dishes food cuisine of Uttar Pradesh राम मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे अयोध्यानगरी गेल्या काही महिन्यांत बरीच चर्चेत आहे. राममंदिराच्या निमित्ताने या स्थळाला पर्यटन स्थळाचे महत्त्व आले आहे (Ayodhya ram mandir famous dishes food cuisine of Uttar Pradesh).
तुम्हीही येथील रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि हे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी अयोध्येला जाण्याचे नियोजन करत असाल तर याठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांबाबत तुम्हाला माहिती असायला हवी.
जिलेबी हा याठिकाणी अतिशय आवडीने खाल्ला जाणारा आणि सहज मिळणारा पदार्थ आहे. याठिकाणी गल्लोगल्ली गरमागरम जिलेबी मिळत असल्याने ही ताजी गरमागरम जिलेबी तुम्ही नक्कीच चाखू शकता.
चाट हे उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड असून यामध्ये पापडी चाट, आलू टिक्की चाट, सामोसा चाट असे बरेच वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात.
खीर हा पारंपरिक पदार्थही आयोध्येत ठिकठिकाणी मिळतो. ही खीर तांदळाची असून ती छान घट्टसर असल्याने आणि दूध, सुकामेवा असल्याने एकदम पौष्टीक असा पदार्थ आहे.
गुलाबजाम ही बहुतांश जणांना आवडणारी स्विट डीश असून खव्यापासून केले जाणारे हे मिष्टान्न उत्तर प्रदेशात अतिशय आवडीने खाल्ले जाते. तेव्हा तुम्हीही आयोध्येला जायचा प्लॅन करत असाल तर इथले गुलाबजाम नक्की ट्राय करा.
रबडी हा दुध, सुकामेव्यापासून तयार केला जाणारा अतिशय चविष्ट असा पदार्थ. ही रबडी गुलाबजाम, जिलेबी यांच्यासोबतही खाल्ली जाते.
कचोरी हाही उत्तर भारतातील अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. नमकीन पदार्थांमध्ये मोडणार आणि गरमागरम अशी ही कचोरी आयोध्येतील महत्त्वाचे स्ट्रीट फूड आहे. याठिकाणची कचोरी आवर्जून खायला हवी.