लग्नासाठी खास बनारसी साडी घ्यायची आहे? पाहा बनारसीचे सध्या ट्रेडिंग असलेले रंग, बनारसीचा थाटमाट खास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 18:18 IST2025-04-08T17:52:28+5:302025-04-08T18:18:48+5:30

Banarasi Saree Trendy 10 Colours : Top 10 Banarasi Sarees Colours for You : Which color Banarasi saree is best : येत्या लग्नसराईसाठी बनारसी साडी विकत घ्यायची असेल तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे बनारसी साडीचे रंग कोणते ते पाहा...

आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात एक ना एक तरी बनारसी साडी (Top 10 Banarasi Sarees Colours for You) असतेच. ही बनारसी साडी (Which color Banarasi saree is best) आपण एखादा खास प्रसंग, लग्नकार्य किंवा मग सणावाराला हमखास मोठ्या हौसेने नेसतोच.

परंतु जर तुमच्याकडे बनारसी साडी नसेल आणि येत्या लग्नसराईसाठी बनारसी साडी (Banarasi Saree Trendy 10 Colours) विकत घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे बनारसी साडीचे रंग कोणते ते पाहूयात.

बनारसी साडीचे सगळेच रंग खूप आकर्षक आणि सुंदर असतात. पण त्यातही हिरव्यागर्द बनारसी साडीचा रंग अगदी देखणा दिसतोच. त्यामुळे तुम्ही गर्द हिरव्या रंगाची बनारसी साडी विकत घेऊ शकता.

हिरव्या रंगासोबतच अशा पद्धतीचा रॉयल पिंक रंग तुम्हांला कोणत्याही खास प्रसंगात अगदी रॉयल लूक देऊन जाईल.

अशा पद्धतीच्या मरुन रंगाची बनारसी साडी म्हणजे अनोखं सौंदर्य. बनारसी साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टी वर्क असते. इतर रंगांपेक्षा मरुन रंगाच्या बनारसी साडीवर बुट्टी वर्क अधिकच खुलून दिसते.

नेव्ही ब्लू रंगाची बनारसी साडी देखील खूप उठून दिसते. आपण लग्नकार्यात किंवा एखाद्या खास प्रसंगात अशा नेव्ही ब्लू रंगांच्या बनारसी साडीची निवड करु शकता.

पिवळ्या रंगाच्या बनारसी साडीवर बुट्टी वर्क अतिशय उठून दिसते.

बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात डार्क जांभळा रंग तुम्हाला रॉयल आणि अगदी शाही लूक देईल.

जर तुम्हाला एखाद्या नाईट पार्टीला ट्रेडिशनल लूक म्हणून साडी नेसायची असेल तर काळ्या रंगाची बनारसी साडी हा एक बेस्ट पर्याय असू शकतो.

बनारसी साडीचा रंग म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या या लाल रंगाची बनारसी सगळ्या रंगात अतिशय आकर्षक दिसते. लाल रंगाच्या बनारसी साडीला फार मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

सध्या बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात ग्रे रंगाचा शेड देखील फार ट्रेंडिंग आहे.

लाल आणि मरुन रंगांप्रमाणेच वाईन कलरच्या बनारसी साडीला देखील फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.