मंगळागौरीसाठी परफेक्ट पारंपरिक लूक हवा? ७ स्पेशल टिप्स, चारचौघीत उठून दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 05:43 PM2023-08-23T17:43:07+5:302023-08-23T17:53:33+5:30

१. श्रावण महिना आला की नववधूंना मंगळागौरीचे वेध लागतात. बहुतेक जणींचा हा लग्नानंतरचा पहिलाच सण असतो. त्यामुळे यादिवशी छानसा मेकअप करून आकर्षक दिसावं, असं वाटणारच. म्हणूनच मंगळागौरीसाठी खास ट्रॅडिशनल लूक करायचाय, पण कसा करावा हे कळत नसेल तर हे काही मराठमोळे लूक पहा..

२. अभिनेत्री सई लोकूर हिने तिच्या पहिल्या मंगळागौरीला असा पारंपरिक लूक केला होता. पारंपरिक नऊवारी जरी असली तरी तिने हेअरस्टाईल स्टायलिश केली होती. त्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत होती.

३. एकदम टिपिकल मराठी लूक करायचा असेल, तर तो अशा पद्धतीने करू शकता. यासाठी हेअरस्टाईलवर जास्त काम करावं लागेल. यामध्ये दाखवल्याप्रमाणे मधोमध भांग पाडून केसांचा छानसा खोपा बांधा. त्यावर आकर्षक खोपा पीन लावा.

४. नऊवारी नेसायची नसेल तर अशा पद्धतीने साडी नेसून आंबाडा घालूनही आकर्षक दिसू शकता. शिवाय यातही तुमचा मराठमोळा लूक नक्कीच जपला जाईल.

५. खूप काही दागिने न घालता फक्त एक चिंचपेटी आणि गळ्यात मोठं लांब मंगळसूत्र असाही लूक छान दिसेल.

६. टिपिकल महाराष्ट्रीयन दागिने असतील तर ते यादिवशी हमखास घाला आणि असा सुंदर मराठी लूक करा.

७. केसांचा आंबाडा घालायचा नसेल आणि थोडा मॉर्डन, ट्रेण्डी लूक करायचा असेल तर अशा पद्धतीने करा. साडी टिपिकल, काठपदराचीच असू द्या. त्यावर स्लिव्हलेस किंवा फॅशनेबल ब्लाऊज शिवा आणि केस मोकळे सोडा. दागिने मात्र मोत्याचे किंवा आपले पारंपरिकच असू द्या.

८. ऑक्सिडाईज दागिन्यांची फॅशन अजूनही ट्रेण्डी आहे. तसे दागिने घालूनही अशा पद्धतीने छानसा पारंपरिक मराठी लूक करता येईल.