लग्न, मौंज, केळवणात जेवणाच्या ताटाभोवती काढा सुंदर रांगोळी, झटपट होणारे ६ सोपे डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 17:07 IST2025-02-26T17:02:05+5:302025-02-26T17:07:39+5:30

लग्नसराई सध्या जोरात असल्याने केळवणाचे कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमांमध्ये वधु- वरांच्या किंवा मौंज असेल तर बटूच्या ताटाभोवती तुम्ही अशा काही सुंदर रांगोळ्या काढू शकता.(beautiful rangoli designs around food plate)

या रांगोळ्या केवळ लग्न, मौंजच नाही तर इतर कार्यक्रमासाठीही खूप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत (border rangoli designs around plate). कारण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त, सणानिमित्त घरी जेवायला पाहुणे येत असतात. अशावेळी त्यांच्या पानाभोवती आपण अशा काही रांगोळ्या काढून ताट आणखी सुशोभित करू शकतो.(jevnachya panasamor kadhnyasathi rangoli designs)

अशी रांगोळी ताटाच्या भोवती असेल तर जेवणारा नक्कीच सुखावून जातो आणि दोन घास जास्त खातो.

जागा थोडी मोठी असेल तर तुम्ही अशी थोडी ऐसपैस सुंदर रांगोळी काढू शकता..

ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे, शिवाय फरशा जर पांढऱ्या रंगाच्या असतील तर त्यावर ती खूप जास्त उठूनही दिसते.

अशा काही रांगोळ्या तुम्ही जेवणाच्या ताटाभोवती तर काढूच शकता, पण पाटाभोवती, देवघरासमोर किंवा मग घराच्या मुख्य दरवाजाला बॉर्डर म्हणूनही काढू शकता.