Beauty Tips : जगात "खूबसूरत" म्हणून प्रसिद्ध या 14 देशातील स्त्रिया, पाहा एकापेक्षा एक जबरदस्त फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 07:02 PM 2021-08-12T19:02:57+5:30 2021-08-12T19:17:29+5:30
Beauty Tips : भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते. महिलांच्या सुंदरतेवर आतापर्यंत दर्जेदार साहित्य लिहिण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेची एक खासियत असते. जगभरातील काही देशातील महिला आपल्या सौंदर्यासाठी खास ओळखल्या जातात.
ब्राझिल ब्राझिल आपल्या भौगोलिक सुंदरतेसाठी ओळखलं जातं. या ठिकाणच्या स्त्रिया संपर्क वाढवण्यासाठी, आपल्या परंपरांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात. देशातील मोठमोठ्या कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावतात.
फ्रान्स फ्रान्स देशातील मध्ययुगीन शहरं, सुंदर गावं, संस्कृती, पदार्थ आणि वाईनसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या महिला आपल्या फॅशन सेंससाठी प्रसिद्ध आहेत. याचे व्यक्तिमत्व नेहमीच आकर्षित करणारे असते.
रशिया रशियन महिलांच्या त्वचेवरील चमक पाहिल्यास एक वेगळेपणा जाणवतो. टेनिस, जिमनास्ट ते मॉडेलिंग सगळ्यात क्षेत्रात रशियन महिलांचे वेगळं स्थान आहे.
स्विडन स्विडन जंगलं, बेटं आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या महिलांची सुंदरता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आपली उंची आणि डोळ्यांच्या आकर्षक रंगामुळे प्रसिद्ध आहेत.
अफगाणिस्तान अफगाणिस्तानचा इतिहास सुरूवातीपासूनच निराशाजनक आहे. या ठिकाणच्या महिला फारच हिंसक दिसून येतात. तरीही या ठिकाणच्या महिला आपल्या सुंदरतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
भारत भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते.
इटली इटली आपली संस्कृती, खाद्य, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आपले अप्रतिम सौंदर्य आणि फॅशन सेंन्समुळे या ठिकाणच्या महिला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत.
तुर्की या ठिकाणच्या महिला आपले सुंदर केस आणि सुंदरतेसाठी ओळखल्या जातात. तुर्कीच्या जाहिरतींमध्ये त्या ठिकाणच्या महिलांची झलक पाहायला मिळते.
वेनेजुएला दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनारी भागात वेनेजुएला हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणच्या महिला खूपच आकर्षक आणि सुंदर आहेत. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त वेनेजुएलातील महिलांचा सहभाग असतो.
पाकिस्तान पाकिस्तानातील अनेक ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय पाकिस्तानी महिला आपल्या स्वचेचा रंग, काळे केसांसाठी ओळखल्या जातात.
ब्रिटन ब्रिटनमधील महिला आपल्या स्किनटोनमुळे ओळखल्या जातात. याठिकाणच्या महिला सर्वाधिक सुशिक्षित असतात. इथल्या एक्ट्रेसपासून, राजकारणी, खेळाडू सगळ्याच महिला कमालीच्या सुंदर असतात.
अमेरिका या ठिकाणच्या महिलांना मोकळेपणानं जगायला आवडतं. सुंदरतेसोबतच त्या आपल्या करीयरचाही चांगला विकास करतात.
युक्रेन पूर्व युरोपचा हा देश चर्च, तटरेषा आणि पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणच्या महिला सुंदर असण्याबरोबरच बोल्ड असतात. सुंदर चेहरा हीच या महिलांची ओळख आहे.