Benefits of eating sweet potato, 5 main reasons for eating ratali or ratalu
उपवासाच्या दिवसांत रताळी खायला विसरू नका, ५ जबरदस्त फायदे, तब्येतही सांभाळली जाईल- उपवासही होईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 03:52 PM2023-10-19T15:52:33+5:302023-10-19T15:58:30+5:30Join usJoin usNext आपल्याला फक्त उपवासाच्या दिवशीच रताळ्याची आठवण येते. पण उपवासाव्यतिरिक्त अन्य वेळीही रताळे खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. रताळे खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात, ते आता पाहूया.... उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त असतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनाही उकडलेली रताळी चालतात. रताळ्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोग यांचा धोका कमी करण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर ठरते. रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वेटलॉससाठीही ते उपयुक्त ठरतात. रताळी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे पुढे काही तास काही खाण्याची इच्छा होत नाही. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांसाठी ते चांगले आहेत. म्हणूनच लहान मुलांनाही आवर्जून रताळी खायला द्यायला पाहिजेत. उपवासादरम्यान अनेकांना अपचन, कॉन्स्टिपेशन, ॲसिडीटी असा त्रास होतो. अशा लोकांनी उपवास काळात एकदा तरी रताळी खायलाच पाहिजेत. टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३वेट लॉस टिप्सNavratri Mahotsav 2023Fasting & FoodWeight Loss Tips