फक्त एकदाच 'हा' प्रयोग करा, दातांचा पिवळेपणा कमी होईल- मोत्यांप्रमाणे पांढरे शुभ्र चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2024 04:46 PM2024-09-06T16:46:31+5:302024-09-06T16:51:55+5:30

दात पिवळे असतील तर चारचौघांसमोर मनमोकळं हसण्याचा, बोलण्याचा कॉन्फिडन्स आपोआपच कमी होतो. (best home remedy for shiny white teeth)

काही जणांचा अनुभव तर असा असतो की ते दिवसातून २ वेळा ब्रश करतात. पण तरीही त्यांच्या दातांचा पिवळेपणा काही कमी होत नाही. (how to get rid of yellow teeth?)

म्हणूनच आता हा एक उपाय करून बघा. दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. हा उपाय aanchalnavneetjain या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा हळद घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि १ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

आता ब्रशवर तुमची नेहमीची टूथपेस्ट थोडीशी लावून घ्या त्यावर हे मिश्रण टाका आणि दात घासा.

अशा पद्धतीने ब्रश करून स्वच्छ गुळणा केल्यानंतर दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखा जाणवेल.