Bhubeej 2021 : गौतमी, मृण्मयीच्या दिवाळी सेलिब्रेशनची बातच न्यारी; अभिनेत्या बहिणींची केमिस्ट्री भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 09:20 AM2021-11-06T09:20:12+5:302021-11-06T09:25:01+5:30

Bhubeej 2021: . सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या.

भाऊबीज हा बहीण भावाच्या (Bhubeej 2021) नात्यातील प्रेम वाढवणारा सण. प्रत्येक घरातील भाऊ बहिण या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. पण ज्या घरात फक्त मुली जन्माला येतात. त्यांना आपल्यालाही भाऊ असता तर आपणंही आनंदानं भाऊबीज साजरी केली असती, हक्कानं गिफ्ट मागितले असते, असे विचार नक्कीच मनात येतात. याऊलट काहीजण असेही आहेत जे आपल्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी करतात. अनेक सेलिब्रिटी आपल्या लहान बहिणींचे औक्षण करून भाऊबीज साजरी करतात.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिची लहान बहिण गौतमी देशपांडे यां दोघींना सख्खा भाऊ नसला तरी कुटुंबात इतर अनेक चुलत भाऊ आहेत त्यांना ओवाळून त्या भाऊबीज साजरी करतात. लाडक्या भावांकडून पैसे वसूल करण्याची संधी अजिबात सोडत नसल्याचं मृण्मयी सांगते.

सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते. तिची धाकटी बहिण गौतमी स्वप्नील जीजूंना भाऊ मानत असल्यानं दरवर्षी भाऊबीजेला या हक्काच्या भावाकडून चांगलेच गिफ्ट्स वसूल करते.

दोघींच्या बॉन्डींगबद्दल बोलताना मृण्मयीनं सांगितलं की, ''आम्ही दोघी कपड्यांपासून, पर्सपर्यंत अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. वैयक्तीक वापराच्या वस्तू वगळता घरात आणलेली प्रत्येक गोष्ट आम्ही दोघी शेअर करतो. अनेकदा गौतमीनं स्वत:साठी आणलेले कपडे, वस्तू मी स्वत: वापरायला घेते.''

दिवाळी म्हटली की फराळ आलचं! सेलिब्रिटींच्याही अनेक आठवणी फराळाशी जोडलेल्या आहेत. मृण्मयीला फराळ पातळ पोह्यांचा चिवडा प्रचंड आवडतो तर याऊलट गौतमी फराळाचे सगळेच पदार्थ खाण्यासाठी उत्साही असते.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पती स्वप्नीलसोबतचा पारंपारिक लूक मधील फोटो शेअर करत मृण्मयीनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर गौतमीनं दिवाळी निमित्तानं आपल्या निळ्या काठपदराच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या दोघींच्याही पोस्टवर हजारो चाहत्यांनी लाईक्ससह कमेंट्सचा वर्षाव केला आहे.