मकर संक्रांतीसाठी पारंपरिक काळा ड्रेस घ्यायचाय? पाहा हटके पॅटर्न्स, काळ्या रंगातही दिसाल खुलून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 10:19 AM2023-01-05T10:19:44+5:302023-01-05T10:20:02+5:30

Black Traditional Dress For Makar Sankranti : काळा रंग कोणावरही खुलून दिसतो. तुम्हाला थोडा फॅशनेबल आणि तरीही ट्रॅडीशनल लूक करायचा असेल तर...

मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे हे समीकरणच आहे. संक्रांतीच्या या सणाला तुम्हाला साडी नको असेल आणि यावर्षी वेगळ्या पॅटर्नचा ड्रेस खरेदी करायचा असेल तर त्यासाठी बाजारात बरेच वेगवेगळे प्रकार आले आहेत. काहीसे हटके मात्र तरीही वापरायला सोपे अशा या ड्रेसचे लेटेस्ट पॅटर्न्स पाहूया (Black Traditional Dress For Makar Sankranti)...

काळा रंग कोणावरही खुलून दिसतो. तुम्हाला थोडा फॅशनेबल आणि तरीही ट्रॅडीशनल लूक करायचा असेल तर अशाप्रकारची पतियाला सलवार आणि वर्क असलेला कुर्ता हा चांगला पर्याय आहे. तुम्ही स्लिवजलेस वापरत असाल तर नाहीतर या ड्रेसला तुम्ही स्लीव्जही लावून घेऊ शकता.

फ्लोरल प्रिंट हा कायम फॅशन इन असणारा प्रकार. सिल्कच्या काळ्या रंगावर आपल्या आवडीच्या रंगाची फुले असलेला ड्रेस आपल्याला छान दिसू शकतो. अशाप्रकारचा ड्रेस आपण रेडीमेड घेऊ शकतो किंवा कापड घेऊन आपल्या मापाप्रमाणे शिवताही येतो.

स्कार्फ, जॅकेट या गोष्टी ड्रेसचा लूक आणखी खुलवण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे आपण आणखी रुबाबदार दिसू शकतो. काळ्या रंगाच्या कोणत्याही ड्रेसवर एखादं ट्रेंडी शॉर्ट किंवा लॉंग जॅकेट मस्त दिसतं.

आपल्याकडे किंवा आई-आजीकडे एखादी तरी काळी साडी असतेच. पण साडी फारशी नेसली जात नाही. त्यामुळे अशा साडीचा लॉंग अनारकली ड्रेस शिवून घेता येतो. यामध्ये आपल्याला हवी तशी फॅशन शिवता येते.

पैठणीच्या ड्रेसचीही सध्या बरीच फॅशन आहे. पण पैठणीच्या पंजाबी ड्रेसपेक्षा असा एखादा अनारकली घेरदार स्कर्ट आणि ब्लाऊज शिवला तर मस्त दिसतो. यावर मोरांच्या डीझाईनची ओढणी घेतल्यास पैठणीचा लूक आणखी खुलतो. हल्ली बाजारातही अशाप्रकारचे रेडीमेड ड्रेस मिळतात.

काळ्या रंगासोबत दुसरा कोणताही रंग छान दिसत असल्याने हेवी किंवा कमी डिझाईनचा काळा ड्रेस आणि त्यावर कलरफूल ओढणी छान दिसते. या ड्रेसमध्ये गळा, बाह्या यांमध्ये बरेच पॅटर्न्स उपलब्ध असतात.