बोट नेक ब्लाऊजचे पाहा १० डिझाइन्स, ऑफिस असो की पार्टी- कायमच दिसाल सुडौल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 07:27 PM2024-07-25T19:27:46+5:302024-07-26T14:18:53+5:30

Boat Neck Blouse Design Front And Back : फॅन्सी नेक लाईन, गोटा पट्टी, कटआऊट डिजाईन्स बोटनेक हे पॅटर्न्स सध्या ट्रेंडीग आहेत.

साडी नेसण्याची फॅशन इव्हरग्रीन असून ही कायम ट्रेंडमध्ये असते. आजकाल रेडीमेड डिजाईन्सचे ब्लाऊज घालणं सर्वांनाच आवडते. रेडीमेड व्यतिरिक्त बोट नेक डिजाईन्सचे ब्लाऊज सध्या बरेच चर्चेत आहेत. (Boat Neck Design Blouse Neck Design)

ट्रेंड डिजाईन्समध्ये आजकाल बोट नेकचे ब्लाऊज बरेच पसंत केले जात आहेत. बोट नेकचे लेटेस्ट ब्लाऊज डिजाईन्स पाहूया. हे ब्लाऊज पॅटर्न्स तुमचा लूक अधिकच आकर्षक बनवतील.

फॅन्सी नेक लाईन, गोटा पट्टी, कटआऊट डिजाईन्स बोटनेक हे पॅटर्न्स सध्या ट्रेंडीग आहेत.

बोट नेकचे ब्लाऊज पॅटर्न्स मागच्या गळ्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. ऑफिसवेअर लूकसाठी हे पॅटर्न उत्तम आहे.

मागच्या बाजूला राऊंड नेक असेल आणि त्यावर बारीक गोळ्यांचे पॅटर्न असेल तुमचा लूक खुलून येईल.

लग्नसमारंभासाठी तुम्ही फॅन्सी खड्यांचे ब्लाऊज शिवू शकता. बाह्यांच्या खाली आणि गळ्याभोवती डिजाईन्स तयार करा.

तुम्ही गळा पूर्ण झाकलेला ठेवू शकतात. बोट नेकमध्ये भरलेला मागचा गळा शोभून दिसतो.

काठाच्या साड्यांवर किंवा कॉटनच्या साड्यांवर ट्राय करण्यासाठी हे उत्तम पॅटर्न आहे.

बोटनेकमध्ये फुग्यांच्या बाह्या सुद्धा चांगल्या दिसातात जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर हे पॅटर्न शिवणं टाळा.

युनिक पार्टी लूकसाठी प्लेन साडीवर तुम्ही डिजाईनचे बोटनेक ब्लाऊज शिवू शकता. (Image Credit- Social Media)