कियारा - कतरिना आणि करीनाच्या होळीची कलरफुल झलक, पाहा अभिनेत्रींचे रंग सेलिब्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 12:51 PM2023-03-08T12:51:59+5:302023-03-08T13:01:12+5:30

Bollywood Actress Holi Celebration Photos : रंगुनी रंगात साऱ्या...बॉलिवूडकरांनी एकमेकांना रंग लावत साजरा केला होळीचा सण

एकमेकांना रंग लावणे आणि पाण्यात मनमुराद खेळणे म्हणजे होळीचा पुरेपूर आनंद लुटणे. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीही या सणांचा पुरेपूर आनंद लुटताना दिसतात. शिल्पा शेट्टी हिने आपल्या मुलांसोबत घराच्या अंगणात फुलांच्या पाकळ्या एकमेकांवर उधळत धुलीवंदन सेलिब्रेट केले (Bollywood Actress Holi Celebration Photos).

तर इकडे करीना कपूरने तैमूर आणि जेह यांच्यासोबत धुलीवंदन खेळतानाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले. यावेळी सैफ अली खान त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे मिस यू सैफू असेही करीनाने आपल्या पोस्टखाली लिहीले आहे.

धुलवंदन खेळताना पांढरे कपडे घालून रंग खेळण्याची पद्धत आहे. मागच्या वर्षी लग्न झालेले अभिनेता विकी कौशल आणि अनेकांची लाडकी कॅट म्हणजेच कैतरीना कैफ यांनी आपल्या कुटुंबासोबत या सणाचा आनंद लुटला.

धगधग गर्ल माधुरी दिक्षित-नेने हिनेही आपले पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासबोत रंग खेळले. यावेळी श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. कायम प्रेम करत राहा असे म्हणत डॉ. नेने यांनी होळीच्या शुभेच्छाही दिल्या.

नुकतेच लग्न झालेले लव्हबर्डस कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ म्हलोत्रा यांनीही लग्नानंतरच्या या पहिल्यावहिल्या सणाचा एकमेकांसोबत आनंद लुटला. यावेळी या कपलने एकमेकांना रंग लावतानाचे त्यांच्या घरातील अतिशय क्यूट असे फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तर बॉलिवूडमध्ये सगळ्यांची लाडकी असलेली आलिया भट हिने रंगबिरंगी छत्री हातात घेत फोटो शेअर केला आहे. यावेळी रॉकी और रानी की प्रेमकहानी या आगामी चित्रपटाच्या सेटवरुनच थेट आलियाने आपला छानसा फोटो शेअर केला आहे.