आता चवळीची शेंग झालेल्या अभिनेत्री बघा आधी किती जाडजूड लठ्ठ होत्या, वजन कमी करण्यासाठी त्यांनी.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 12:01 PM 2024-10-26T12:01:49+5:30 2024-10-26T14:16:38+5:30
मनात आणलं तर कठोर मेहनत करून, तज्ज्ञ फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेऊन वजन बऱ्याच प्रमाणात कमी करता येतंच.. आता आपल्याला एकदम स्लिम- ट्रिम दिसणाऱ्या काही बॉलीवूड अभिनेत्री काही वर्षांपुर्वी बघा किती लठ्ठ होत्या..
सारा अली खान हे एक त्याचं उत्तम उदाहरण. चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी सारा अतिशय हेल्दी होती. तिला पीसीओडीचा त्रास असल्याने तिचं वजन एवढं वाढलं होतं. तिने तब्बल ४० किलो वजन कमी केलं. त्यासाठी तिने कित्येक वर्ष गोड पदार्थ आणि जंकफूड खाणे बंद केले होते.
'सावरिया' चित्रपटात झळकलेली सोनम आपल्याला एकदम बारीक दिसली. पण त्यापुर्वी काही वर्षे तिचे वजन तब्बल ७९ किलो होते. तिला सुद्धा पीसीओडी आणि मधुमेह असे त्रास होते.
वेगवेगळ्या चित्रपटांमधून उल्लेखनिय भूमिका करून भुमी पेडणेकर हिने तिची खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिने तिचे वजन खूप वाढवले होते. त्यानंतर मात्र पुढच्या काही महिन्यांतच तिने तब्बल ३३ किलो वजन कमी करून स्वत:चे एकदमच बदलून गेलेले रूप चाहत्यांसमोर आणले.
कार्डिओ, योगा असं सगळं हेवी वर्कआऊट आणि डाएट करून सोनाली सिन्हाने दबंग चित्रपटात पदार्पण करण्यापुर्वी ३३ किलो वजन कमी केलं होतं.
आता एकदम स्लिम- ट्रिम दिसणारी अभिनेत्री परीणिती चोप्रा ही देखील तिच्या टीनएजमध्ये बऱ्यापैकी हेल्दी होती.