दीपिका पादुकोणप्रमाणेच बाळंतपणानंतर महिना भरातच कामावर रुजू झालेल्या ५ बॉलीवूड अभिनेत्री- जिद्दीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 01:45 PM2024-10-17T13:45:12+5:302024-10-17T13:53:56+5:30

आई होणाऱ्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात शारिरीक, मानसिक स्तरावर खूप मोठा बदल होत असतो. मग ती सामान्य स्त्री असो किंवा मग एखादी सेलिब्रिटी असो. पण हा बदल पचवून आणि त्यात अडकून न पडता चटकन त्यातून बाहेर पडून आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या अनेक स्त्रिया आपण आजुबाजुला पाहातो.

बॉलीवूड अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत. आताच अगदी ताजं उदाहरण म्हणजे दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दीपिकाने मागच्या महिन्यातच मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या एक महिन्यातच ती कामासाठी बाहेर पडली असून तिने नुकतंच एका जाहिरातीचं शुटिंगही केलं.

अशा पद्धतीने बाळंपणानंतर लगेचचच कामावर रुजू होणारी दीपिका पहिलीच नाही. आलिया भटनेही (Alia Bhatt) मुलगी राहाच्या जन्मानंतर अवघ्या दिड- दोन महिन्यांतच कामाला सुरुवात केली होती.

गरोदरपणी आणि त्यानंतरही किती उत्तमपणे काम करता येतं, याचं बॉलीवूडमध्ये एक उदाहरण सेट करणारी अभिनेत्री म्हणजे करिना (Kareena Kapoor). करिनाने तिच्या दोन्ही मुलांच्या वेळी गरोदर असतानाही काम केलं. एवढंच नाही तर दोन्ही वेळा तिने बाळंतपणानंतर लगेचच कामाला सुरुवात केली.

मलायकाने मुलाच्या जन्मानंतर फक्त ४० दिवसांचा ब्रेक घेतला होता (Malaika Arora). काही मुलाखतींमध्ये तिने असं सांगितलं आहे की तिला खरंतर एवढाही ब्रेक घेण्याची गरज वाटली नव्हती. पण घरच्यांचा आणि विशेषत: आईचा आग्रह होता म्हणून ती तेवढे दिवस कामापासून दूर राहिली.

नेहा धुपियानेही (Neha Dhupiya) गरोदरपणात तर काम केलेच पण मुलीच्या जन्मानंतर लगेचच दिड महिन्यात कामाला सुरुवातही केली.

अभिनेत्री भारती सिंह (Bharati Singh) हिने तर मुलीला जन्म दिल्यानंतर कामातून फक्त १२ दिवसांचा ब्रेक घेतला होता. बघा आहे ना या सगळ्यांची कमाल... आपल्याला वाटतं अभिनेत्रींचं आयुष्य खूप सोपं, आनंददायी, आरामदायी असतं. पण तसं नाही. त्या सुद्धा कुणाशीतरी बांधील आहेत. त्यामुळेच तर बाळंतपणाचा उगाचच बाऊ न करता त्यांचं कर्तव्य पार पाडायला त्या लगेच तयार झाल्या...