प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 13:30 IST2025-03-17T13:13:50+5:302025-03-17T13:30:39+5:30

प्रेम वेडं असतं... त्याला वयातलं बंधनही समजत नसतं. समोरचं व्यक्ती फक्त आवडून गेलं आणि त्याचंही तेवढंच भरभरून प्रेम मिळालं की झालं.. बस्स...असंच काहीसं बॉलीवूड सेलिब्रिटींचंही झालेलं आहे.

सध्या नवरा- बायकोमध्ये अगदी १ ते २ वर्षांचं अंतर असावं असा जमाना आलेला असताना कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटी कपल्सच्या वयात मात्र खूप मोठा फरक दिसून येतो.. असे सेलिब्रिटी नेमके कोण आहेत ते पाहूया..

पहिली जोडी आहे डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची. डिंपल वयाच्या अवघ्या १६ वर्षी राजेश खन्ना यांच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्नसुद्धा केलं. त्यावेळी राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते.

आताची सुपरहिट जाेडी म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. या दोघांच्या वयात तब्बल ११ वर्षांचं अंतर आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं लग्नही असंच.. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे.

शाहिद कपूर आणि मीरा कपूर या दोघांमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे..

संजय दत्त आणि मान्यता दत्त या दोघांमध्ये १९ वर्षांचं अंंतर आहे. यामुळे त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून विरोधही झाला होता. पण शेवटी त्यांचं प्रेम जिंकलं..

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा यांच्या वयातही ९ वर्षांचं अंतर आहे. दोघांना एकत्र पाहताना हा फरक कधीही जाणवत नाही..

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचं लग्न झालं तेव्हा दिलीपजी ४५ वर्षांचे होते तर सायरा बानो फक्त २२ वर्षांच्या होत्या.