Bornan Rangoli Designs : बोरन्हाण विशेष सोप्या मस्त रांगोळ्या; १० नवीन डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:00 IST2025-01-16T13:08:29+5:302025-01-16T14:00:23+5:30

Bornan Rangoli Designs : या रांगोळीत तुम्ही पंतग, हलव्याचे दागिने, हळदी कुंकू अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवू शकता.

संक्रात झाल्यानंतर घरोघरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या उत्साह दिसून येतो.

ज्यांच्या घरी लहानबाळ असते त्यांच्याकडे संक्रात आणि बोरन्हाण असा दुप्पट उत्साह असतो.

बोरन्हाणच्या दिवशी तुम्ही दारासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढून घर सजवू शकता. बोरन्हाण विशेष सोप्या रांगोळ्या पाहूया.

जर तुम्ही घरात डेकोरेशन करणार असाल तर घरातही या रांगोळ्या काढू शकता.

या रांगोळीत तुम्ही पंतग, तिळ गूळ, हलव्याचे दागिने, हळदी कुंकू अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवू शकता.

लहान मुलांचे चित्र, दागिने, मोरपीस असे वेगवेगळे घटक तुम्हाला रांगोळीत दाखवता येतील.

या रांगोळीवर तुम्ही मुलांच्या किंवा मुलींच्या नाजूक कपड्यांची डिजाईन काढू शकता.

पतंगात एक मुकूट काढून त्यावर मोरपिस काढून बोरन्हान लिहू शकता.

या प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला यु ट्यूबवर सहज पाहायला मिळतील.

(Image Credit- Social Media)