bugadi earrings latest patterns, attractive bugadi earrings for marathi look
लग्नसराईत घालायलाच हवी टिपिकल मराठी बुगडी! बघा ८ सुंदर पॅटर्न- चारचौघीत उठून दिसाल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2024 09:15 AM2024-11-26T09:15:43+5:302024-11-26T09:20:01+5:30Join usJoin usNext लग्नसराईचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने टिपिकल महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर कानात ठसकेबाज बुगडी असायलाच हवी. म्हणूनच बघा बुगड्यांचे हे काही सुंदर पॅटर्न्स.. मोती आणि स्टोन यांचे सुंदर कॉम्बिनेशन असणारी ही नाजुक बुगडी लहान मुलींनाही खूप सुंदर दिसेल. थोडी ठसठशीत प्रकारची बुगडी आवडत असेल तर हे एक डिझाईन सुरेख आहे. बुगडीचा हा एक नाजूक देखणा प्रकार. सगळ्याच वयोगटातील महिलांना ही बुगडी शोभून दिसणारी आहे. ही बुगडी थोडी नव्या पद्धतीची आहे. ज्यांना कानाच्या वर आणि खाली अशा दोन्ही बाजुंनी दिसणारी बुगडी आवडत नाही, त्यांना या प्रकारची बुगडी आवडू शकते. ऑक्सिडाईज प्रकारातल्याही अनेक सुंदर आकर्षक बुगडी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही त्या मागवू शकता. नेहमीच्या त्याच त्या प्रकारच्या टिपिकल बुगडी आवडत नसतील, तर हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. या बुगडीचं डिझाईन इतर बुगड्यांपेक्षा खूप वेगळं आहे. अशा प्रकारची बुगडी तुम्ही अगदी वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता.टॅग्स :खरेदीफॅशनदागिनेShoppingfashionjewellery